Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आंदोलनापूर्वी जरांगे भावूक झाले, अश्रू तरळले; समाजाच्या काळजात धस्स झालं..
Top News

आंदोलनापूर्वी जरांगे भावूक झाले, अश्रू तरळले; समाजाच्या काळजात धस्स झालं..

Maratha Andolan Jarange Emotional

Maratha Andolan Jarange Emotional : सरकारने गोळ्या घालून मारलं तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं म्हणत असताना मनोज जरांगेचा कंठ दाठलेला असताना डोळ्यांतून अश्रू जमिनीवर तरळले. त्यांच्या या वाक्याने आणि त्या भावूक क्षणाने उपस्थित मराठा समाजाच्या काळजात धस्स झालं. मनोज जरांगे यांनी आज आपल्या मुळ गावी अंतरवली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांचा आतापर्यंत सर्वांनी आक्रमक चेहरा आणि रागीट स्वभाव पाहिला आहे. मात्र, हा भावनिक आणि व्याकूळ झालेला चेहला संपूर्ण महाराष्ट्राने आज पहिला आहे. मुंबईत झालेल्या उपोषणावेळी मराठा समाला उद्देशून म्हणाले होते हे शेवटचं आंदोलन आहे. यावेळी हा मुद्दा पत्रकांरांनी छडला, त्यावर जरांगे म्हणाले चांगल्या कामाला कधची शेवट नसतो, आंदोलन हे मराठा समाजाच्या चांगल्या कामासाठी आहे.

अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांनी येऊ नये – जरांगे

मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते थोडे भावनिकही झाल्याचे दिसून आलं. अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांनी येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र आज त्यांचं आमरण उपोषण सुरू होतयं, तेव्हा अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने जमलेले दिसले. समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून आपला कंठ दाटून आला, आपण भावूक झालो अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

मी माझ्या समाजासाठी मरायला तयार – जरांगे

लोकांचा किती जीव आहे माझ्यावर, इथे अंतरवालीत उभं रहायला जागा नाही, ते पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. हा काहीतरी देऊ शकेल, समाजाला माझ्याकडून आशा आहे. सरकार वारंवार मराठ्यांवर अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही, असं भावनिक झालेले जरांगे म्हणाले.

मला इथे गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार – जरांगे

अंतरवलीत आलेले लोक पाहून हुंदका दाटून आला, इतकं प्रेम कोणालाही मिळू शकणार नाही. माझ्या मराठ्यांवर अन्याय सरकारने करू नये ही माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली की तुम्ही माझ्या समाजाल वेठीस धरू नका, माझ्या समाजाच्या लेकराबाळांनी काहीही केलं नाहीये. हे सरकार सारखा अन्याय करत आहेत. मला इथे गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार आहे. तडफडून जरी या तळपत्या उन्हात मरू दिलं, तरी मी मरायला तयार आहे, असं जरांगे म्हणाले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts