Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अशोक खरात प्रकरणावर चित्रपटाच्या घोषणेनंतर धमकीचे फोन? दीपाली सय्यदांचा खळबळजनक दावा
मनोरंजन

अशोक खरात प्रकरणावर चित्रपटाच्या घोषणेनंतर धमकीचे फोन? दीपाली सय्यदांचा खळबळजनक दावा

Deepali Sayyed: राज्यात चर्चेत असलेल्या नाशिकचे अधिक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद महत्वाची भूमिका साकारणार असल्याने या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा दावा दीपाली सय्यद यांनी केला आहे. कोणत्याही कलाकारावर दबाव आणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या प्रकारांना विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: CM विजय आणि PM मोदी समोरासमोर; भेटीने राजकारणात खळबळ, 25 मिनिटांत काय ठरलं?

या चित्रपटात कथित स्वरूपात सामाजिक आणि राजकीय संदर्भ असलेली काही पात्रे दाखवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही घटकांकडू चित्रपटातील सहभागावर आक्षेप घेत दबाव आणला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

दीपाली सय्यद यांनी सांगितले…

दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कलाकाराला आपली भूमिका साकारण्याचे स्वातंत्र्य असले पहिले. एखाद्या विषयावर आधारित चित्रपट बनत असेल तर त्याकडे कलात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, मात्र धमक्या किंवा दबाव टाकणे योग्य नाही.

दरम्यान, अशोक खरात प्रकरण यापूर्वीही राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. कथित आध्यात्मिक प्रभावाचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आले होते. या घटनेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

सध्या या प्रकरणावर आधारित चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी तो वास्तव घटनांवर आधारित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक नवे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts