Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी, लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आणि शेतकऱ्यांच्या जमीन-जुमला लुटल्याप्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो पोलीस कोठडीत शिक्षा भोगत आहे. खरातने आत्तापर्यंत इतके काळे कारनामे केले आहेत की एसआयटीकडून (SIT) अजूनही या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आता दोन महिने उलटून गेले तरीही खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आताही खरातचा मोठा प्लॅन समोर आला आहे ज्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
हेही वाचा – बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा केला खात्मा
3 महिन्यांपूर्वी अशोक खरातने नेमका काय आखला होता प्लॅन?
अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आताही एक मोठा आणि धक्कादायक असा खुलासा झाला आहे. अशोक खरातने 3 महिन्यांपूर्वी खतरनाक असा प्लॅन आखला होता, ज्यामुळे आज तो पोलिसांच्या हाती सापडला नसता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने तीन महिन्यांपूर्वी एक मोठा प्लॅन आखला होता. या प्लॅननुसार खरात त्याच्याकडे असलेला काळा पैसा पांढरा करून त्याने केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागण्यापूर्वी परदेशात पसार होण्याचा डाव रचला होता. तसेच त्याने तब्बल 52 कोटी रूपयांची अफरातफर देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अनेक बडे अधिकारी तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
‘समता पतसंस्थेत’ अशोक खरातने तब्बल 65 बनावट बँक खाती उघडली होती. ही सर्व खाती खरात स्वत: हाताळत होता. तर जानेवारी महिन्यात त्याने अवघ्या चार दिवसांमध्ये 200 पेक्षा जास्त व्यवहार करत तब्बल 52 कोटी रूपये काढून घेतले होते. तर हा सर्व पैसा गोळा करून तो परदेशात पळून जाणार होता, असा प्लॅन खरातने आखला होता, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नये म्हणून खरातने एक मोठी शक्कल लढवली होती. त्याने 2025-26 मध्ये तिन्ही मुख्य खात्यांमध्ये 1,99,000 रूपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार केले होते. बँकांचे 2 लाख किंवा त्याहून जास्त व्यवहारांकडे लक्ष असते. तर ही गोष्ट खरातला माहिती असल्यामुळे त्याने शक्कल लढवत 1.99 लाखांचे अनेक व्यवहार करत पैसा गोळा केला होता, अशी माहिती समोर आली आहे. खरातच्या या प्लॅनने पोलिसांना आणि तपास यंत्रणांना देखील मोठा धक्का बसला आहे.












