• Home
  • राजकारण
  • “रूपाली चाकणकर अन् खरातचा तो फोटो रॅडिसन ब्लूचा…”; दमानियांचं गौप्यस्फोट करणारं ट्विट, केला मोठा खुलासा
Top News

“रूपाली चाकणकर अन् खरातचा तो फोटो रॅडिसन ब्लूचा…”; दमानियांचं गौप्यस्फोट करणारं ट्विट, केला मोठा खुलासा

kharat chakankar

Anjali Damania On Rupali Chakankar | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात प्रकराणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ढोंगी अशोक खरातने (Ashok Kharat) अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच त्याने अनेक महिलांना फसवत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. याच खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध देखील होते. यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या कुटुंबाचे आणि खरातचे चांगले संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर खरात प्रकरणात रूपाली चाकणकरही सामील असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे. तसेच चाकणकरांचे खरातसोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वीच चाकणकर आणि खरात यांनी गुवाहाटीला एकत्र प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी चाकणकरांचा खरातसोबतचा एक फोटो शेअर करत मोठा गौप्यस्फोट केला आहे, ज्यामुळे चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.

हेही वाचा – पश्चिम बंगाल पेटलं! दंगलखोरांचा धुमाकूळ; दगडफेक करत पोलीस ठाण्यावर हल्ला, नेमकं कारण काय?

अंजली दमानिया यांनी नेमका काय केला खुलासा?

अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटीवर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचं म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटीला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली त्यांनी फक्त तीनच नावांची उल्लेख केला आहे. रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात.

28 ऑगस्ट 2021 ला खरोखर 3 माणस गेली होती की 12 माणसे गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्वाची बाब म्हणजे, ह्या तारखेनंतर दोन महिन्यात, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. बरं, त्या माध्यमाच्या बातमीमध्ये आणि एक तारीख होती ती म्हणजे 30/06/2023. 30 जूनला रुपाली चाकणकर ह्या पुन्हा गुवाहाटीला गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या आणि 2 जुलैला परत आल्या. ह्याच तारखेला अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि 2 जुलैला त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला. तिसरी गोष्ट, हा फोटो रॅडिसन ब्लूचा आहे गुवाहाटीचा नाही असं आत्तातरी वाटतं आहे. त्यामुळे मी ही माहिती SIT ला पाठवली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की त्यांनी ह्याचा तपास करावा, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यानंतर रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून रूपाली चाकणकरांचे खरातची भेट घेतल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच त्या खरातला आपला गुरू मानत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे चाकणकरांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts