• Home
  • ताज्या बातम्या
  • पश्चिम बंगाल पेटलं! दंगलखोरांचा धुमाकूळ; दगडफेक करत पोलीस ठाण्यावर हल्ला, नेमकं कारण काय?
Top News

पश्चिम बंगाल पेटलं! दंगलखोरांचा धुमाकूळ; दगडफेक करत पोलीस ठाण्यावर हल्ला, नेमकं कारण काय?

west bengal 1

West Bengal | पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दंगलखोरांनी मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पश्मिच बंगाल हादरलं आहे. पश्चिम बंगालमझील आसनसोल (Asansol) जिल्ह्यात धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यावरून वाद झाला. या वादानंतर एका विशिष्ट समुदायाच्या जमावाने पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालत दगडफेक केली.

हेही वाचा – अरेरे! चक्क गायकावर पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

आसनसोलमध्ये नेमकं घडलं काय?

दंगलखोरांनी पोलीस ठाण्यावर आणि पोलिसांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान केले आहे. तर आजूबाजूच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचीही तोडफोड केली आहे.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसनसोलमधील जहांगिरी मोहल्ला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मुस्लिम आणि हिंदू रहिवाशांना धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याचा प्रशासकीय संदेश देण्यासाठी रेलपार परिसरात दाखल झाले होते. यानंतर, परिसरातील मंदिरे आणि मशिदींमध्ये सभा सुरू होत्या. या सभांदरम्यान वाद निर्माण झाला आणि या वादानंतर एका विशिष्ट समुदायाचे समाजकंटक जहांगिरी मोहल्ला पोलीस ठाण्याजवळ आले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. दंगलखोरांनी पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घातला आणि आतील सर्व वस्तूंची तोडफोड केली. त्यांनी आजूबाजूच्या परिसराचीही नासधूस केली.

दंगलखोरांच्या या हल्ल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दंगलखोरांना पांगवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करावे लागले आणि त्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात आली. तसेच परिसरातील तणाव लक्षात घेता तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या संपूर्ण परिसरात पोलीस तैनात असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच गुन्हेगारांना ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts