Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • अरेरे! चक्क गायकावर पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष
Top News

अरेरे! चक्क गायकावर पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

Gujarat Viral Video: गुजरातमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गायकावर नोटांचा अक्षरशः वर्षाव झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

गुजरातमध्ये आयोजित एका डायरो कार्यक्रमात एका गायकावर अक्षरशः नोटांचा वर्षाव केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार द्वारका जिल्ह्यातील खंभाळिया येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहातील सादरीकरणादरम्यान घडला. कार्यक्रमात गायक आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना अनेकांनी उत्साहात नोटांचा वर्षाव केला. काही क्षणांसाठी गायक नोटांच्या ढिगाऱ्याखाली जवळपास झाकला गेला, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

या कार्यक्रमाचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे की कार्यक्रमाच्या खर्चानंतर उरलेली सर्व रक्कम आणि देणग्या सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत. ही रक्कम अहिर चॅरिटेबल ट्रस्टकडे सुपूर्त करण्यात येणार असून, त्यातून गुजरातमधील अहिर कन्या छात्रालय (मुलींचे वसतिगृह) आणि अहमदाबाद येथे शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी याला सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हटले आहे, तर काहींनी अशा प्रकारांवर चर्चा सुरू केली आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts