Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यामागचं धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या कारण
Top News

अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यामागचं धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या कारण

Adhik Maas Rituals: अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. यंदा हा मास १७ मेपासून सुरू झाला आहे. या काळात जावयाची पूजा करून त्याला वाण दिले जाते. मात्र या परंपरेमागील धार्मिक कारण अनेकांना माहीत नसते. चला तर आजच्या या लेखातून ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. यंदा अधिक मास हा १७ मे २०२६ पासून सुरू झाला आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा काळ “पुरषोत्तम मास” म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; टीईटी सूट फेटाळली, शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2028 पर्यंत मुदतवाढ

अधिक मसाला पूर्वी “मलमास” असेही म्हटले जात असे आणि तो अशुभ मानला जात असे. मात्र नंतर भगवान विष्णूंना या महिन्याचा स्वीकार केला आणि त्याला “पुरषोत्तम मास” असे नाव मिळाले. त्यामुळे या महिन्यात विष्णू उपासनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

पुरुषोत्तम मास का म्हणतात?

असे मानले जाते की अधिक मास हा सुरुवातीला कोणत्याही देवतेच्या अधिपत्याखाली नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित होता. त्यानंतर भगवान विष्णूंना त्याला आपले नाव देत “पुरषोत्तम मास” म्हणून मान्यता दिली. म्हणूनच या काळात विष्णू पूजन, व्रत आणि दानधर्मांचे विशेष महत्व सांगितले जाते.

अधिक महिन्यात जावयाची पूजा का केली जाते?

या महिन्यात जावयाला विष्णू स्वरूप मानले जाते. हिंदू परंपरेनुसार कन्यादानाचे वेळी असा संकल्प केला जातो की कन्या ही लक्ष्मी स्वरूप असून तिचा स्वीकार करणारा वर(जावई) हा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप मानला जातो.

म्हणूनच अधिक महिन्यात जावयाची पूजा करून त्याला वाण देण्याची प्रथा आहे. जावयाचा सन्मान करणे म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंची पूजा केल्यासारखे मानले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

या काळात जावयाला विविध प्रकारच्या वस्तूंचे दान दिले जाते. विशेषतः छिद्र असलेल्या ३३ वस्तूंचे दान करण्याची परंपरा सांगितले जाते. यामध्ये बत्तासे, अनारसे यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. हे दान शुभ आणि पुण्यकारक मानले जाते.

अशा प्रकारे अधिक मासात जावयाचा सन्मान, पूजन आणि वाण देण्यामागे धार्मिक श्रद्धा आणि भगवान विष्णूंची उपासना हे मुख्य कारण मानले जाते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts