Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Video
  • राज्यातील शिक्षणाच्या दर्जावरून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता
Video

राज्यातील शिक्षणाच्या दर्जावरून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

uality of education in the maharastra

उद्धव ठाकरे यांनी भाषणात शिक्षणव्यवस्था, शिक्षकांवरील फंडअभावी येणाऱ्या अडचणी आणि पालिकेतील गैरव्यवस्थापनावर सरकारवर जोरदार टीका केली. “दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे बाहेर पडलेले लोक—त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही” असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. चांगले शिक्षक न मिळाल्याने समाजात बिघाड होतो, सोनम वांगचुक प्रकरण हे त्याचं उदाहरण असल्याचे ते म्हणाले. तांत्रिक बदलांसोबत शिक्षण पद्धती बदलली पाहिजे, पण गेल्या तीन वर्षांत पालिका कोण चालवत आहे हेच कळत नाही, “टॅब आणि SD कार्ड योजना कोलमडली” असा आरोप त्यांनी केला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या शैक्षणिक सुधारणांमुळे पालिका शाळांमध्ये वेटिंग लिस्ट निर्माण झाली असेही त्यांनी सांगितले.मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून, महिलांना ‘फुकट शिक्षण’ म्हणत पैसे आकारले जात असल्याचं त्यांनी सांगत शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेत असल्याचा उल्लेख केला.शेवटी, “रेवडी घेऊन चुकीचे लोक निवडले जातात” अशी टीकाही त्यांनी मतदारांवर केली.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts