उराशी घेतलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे लागतो हे वाक्य खोटं ठरवत कठोर परिश्रम घेऊन हालाकीच्या परिस्थितीत एका ऑटो चालकांच्या मुलाने NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जाणून घेऊया त्याच्या यशाबद्दल
एक सर्वसाधारण घराण्यातील रिक्षावाल्याचा मुलगा याने सर्व अडचणी वर मत करत कठोर परिश्रम घेऊन देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा उत्तीर्ण करत त्याने आता एमबीबीएसला प्रवेश मिळवला. तेही एका नामांकित अंबाजोगाई येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालायात. त्या मुलाचे नाव म्हणजे राहुल घुमरे. ही घटना आहे पुण्याची. सर्व सोयीसुविधांचा अभाव असताना देखील आणि वडील रिक्षा चालक असताना देखील NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याने पुण्यात राहुल घुमरे याचे प्रचंड कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पिंपळगाव घुमरी हे मुळगाव असलेले राहुल घुमरेचे वडील तात्याभाऊ घुमरे गेल्या २० वर्षांपासून पुण्यात ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी दररोज कठोर परिश्रम घेत बऱ्याच गोष्टींचा त्याग करत मुलांच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. त्यांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे एकच धैर्य ठेवत आपले काम सुरु ठेवले. त्यांचे हे धैर्य आणि परिस्थितीची जाण ठेऊन राहुलने त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले.
प्रत्येकाचे शिक्षण घेऊन आवडत्या विषयात करियर कारण्याची इच्छा असते. डॉक्टर होण्यासाठी neet परीक्षा उत्तीर्ण होते गरजेचे असते. राहुल चे देखील डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. ते सत्यात उतरवण्यासाठी त्याने NEET परीक्षा उत्तीर्ण केली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये लागतात. हे शुल्क भरणे सर्वसाधारण कुटुंबातील कर्त्या माणसाला भरणे शक्य होत नाही. अशावेळी राहुलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हाथ म्हणून अजिंक्य रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन मोशन क्लासेसमधील राहुलचे कोचिंग फी माफ करण्यास मदत केली. त्यांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे राहुलला कोणत्याही आर्थिक ओझ्याशिवाय अभ्यास करता आला आणि NEET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला. असा मदतीचा हाथ प्रत्येकासाठी गरजेचा असतो.
एका रिक्षाचालकाचा मुलगा NEET उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याच पत्रकारांनी त्याचा इंटरव्हू घेतला. यावेळी त्याने सांगितले कि, माझ्या वडिलांचे कठोर परिश्रम आणि त्यांचा सल्ला मला इथे घेऊन आला आहे” त्याने मिळवलेल्या यशाबद्दल कल्याणीनगर जॉगर्स पार्क ग्रुप आणि अजिंक्य रिक्षा असोसिएशनने राहुलला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिल्याबद्दल सन्मानित केले.
कोणत्याही परिस्थितीचा सामना करून आपण आपले ध्येय साध्य करून परिस्थितीवर मात करू शकतो. हे राहुल घुमरेकडून शिकण्यासारखे आहे.