अहिल्यानगर संभाजीनगर या रोडवर कोटला गावात रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची विटंबना झाल्याने संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील कोटला या गावात एका मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची विटंबना झाल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने रोडवर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना केली आहे. यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असूनया संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला असून जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आलाय.
या संपूर्ण घटनेने कोटला परिसरात मुस्लिम तरुण आणि समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या ठिकाणी एका तासापेक्षा जास्त काळ हे आंदोलन सुरू होते, ज्यामुळे महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.