माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी चर्चा करताना अनेक विषय मांडले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीची घोषणा होण्याचे सूचक संकेत राऊतांनी यावेळी दिल्याचं सांगितलं जात आहे. पाहूयात संजय राऊत नेमकं काय म्हणालेत…
दसरा मेळाव्याला युती होणार?
आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या घोषणेसंदर्भात राऊतांनी सूचक विधान केलं. पत्रकारांकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं आहे का? असा सवाल राऊतांना विचारण्यात आला. त्यानंतर राऊतांनी सूचक प्रतिक्रिया नोंदवली.”चर्चा आहे, चांगली चर्चा आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं,” असं सूचक विधान राऊतांनी केलं. “आमचा संघाचा दसरा मेळावा नाही. एक परंपरा आहे, दसरा मेळाव्याची आमची. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही,” असं राऊत म्हणाले.
राजकीय वातावरण तापलं
दरम्यान, संजय राऊतांच्या या संकेतानंतर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राजकीयदृष्टया दोन भाऊ एकत्रित येत असतील चांगलीच गोहस्त आहे. मात्र त्याच्या एकत्र येण्याचा महायुतीला कोणताही धक्का बसणार नाही असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. तर भाजपचे गिरीश महाजन यांनी म्हटलं,कि ” मुंबईत काहीही करा,पण मुंबईकरांचा विश्वास महायुतीवरच.”