Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मावळात भाजप कार्यकर्त्यांने उभारला अजित पवार यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा
Top News

मावळात भाजप कार्यकर्त्यांने उभारला अजित पवार यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा

Ajit Pawar statue
127

Ajit Pawar statue : मावळ तालुक्यातील आढले येथील गुरुकुल विद्यालय परिसरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा भाजप कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून उभारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच अजितदादांचे विकासाभिमुख विचार, स्वच्छतेबाबतचा संदेश आणि समाजहिताची भूमिका कायम स्मरणात राहावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली थेट धमकी; म्हणाले, आम्ही इतका मोठा हल्ला करणार की तुम्ही…

गुरुकुल संस्थेचे विश्वस्त सचिन घोटकुले यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामागे शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी, शिस्त, स्वच्छता आणि आदर्श नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांनी राज्यातील पायाभूत सुविधा विकास, जलसंधारण प्रकल्प, ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान तसेच शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवून जबाबदार नागरिक म्हणून घडावे आणि लोकसेवा, विकास व पारदर्शक प्रशासनाची प्रेरणा या पुतळ्याच्या माध्यमातून सातत्याने मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts