काल विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्री मध्ये ठेवल्याचा दावा केलाय. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद विवाद सुरु आहे.
दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह मातोश्रींवर ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. तसेच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण..?
मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे … या वर्षी निधन झाले होते. त्यावेळी बाळासाहेबांचा मृतदेह सलग 2 दिवस मातोश्री मध्ये ठेवण्यात आला होता, तसेच यावेळी त्यांच्या दोन्ही हाताचे ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमकं कशासाठी घेतले? बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता? दोन दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला? तुमचं अंतर्गत काय चाललं होतं? असे सवाल रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात भाष्य करताना उपस्थित केले.
या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी तिथे होतो, हे तिथे नव्हते, आम्ही त्यावेळी मातोश्रीवर होतो. तसेच बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात आम्ही तिथे शेवटपर्यंत थांबलो. आम्हाला माहित आहे. आता यांच्या तोंडात भीतीपोटी कुणीतरी शेण कोंबलं असेल आणि ते आता बोलत असतील तर काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटलं असून शिवसेनाप्रमुखांना आता शंभर वर्ष होत आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला आणि आम्हाला मोठं केलं, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला, आम्हाला मोठं केलं, त्यांच्याशी ही बेईमानी असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले असून रामदास कदम यांनी उपस्थित केलेले प्रश्न चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे कि, त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता..? याबाबत माहिती काढा, मी जबाबदारीने मोठे विधान करत असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आज देखील विचारा, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस का ठेवला होता ? त्यावेळी काय चालले होते? मी 8 दिवस मातोश्रींच्या बाकड्याखाली झोपलेलो होतो. हे सगळं कशासाठी हे सगळं कळत होते. असे वक्तव्य दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केले आहे.