Eknath Khadse house theft : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याघरी चोरटयांनी हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि काही रक्कमचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करण्यास सुरुवात केली आहे. आता या चोरट्यांना शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. चोरटयांनी मध्यरात्रीच्या सुमारास खडसे यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील रूम मधील कपाटातून ऐवज लंपास केला. हा प्रकार आज सकाळी घरकामगार करण्यासाठी आल्यानंतर उघड झाला आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून चोरटयांनी नेम साधला.
दिवाळीसाठी सर्वजण गावी जात असतात. त्याप्रमाणेच एकनाथ खडसे देखील बाहेरगावी गेले होते. आणि त्यांच्या घरी असलेला सुरक्षारक्षक देखील यावेळी सुट्टीवर होता. याच संधीचा फायदा उचलून चोरटयांनी घराचे कुलूप तोडले. आणि ऐवज लंपास केला. या घटनास्थळी पोलीस पोहोचले असता त्यांना घरातील सर्व कपाटे उचकलेली दिसली. संपूर्ण सामान अस्थाव्यस्थ पडलेले होते. पोलीस घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 35 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय रक्षा खडसे यांच्या रूम मध्ये देखील चोरट्यांनी प्रवेश करत ऐवज लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याचे वृत्त देखील समोर आले होते. आता त्यांच्या घरी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हे हि वाचा : PCMC officers transfer : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अधिकाऱ्यांचे खाते बदल व अतिरिक्त कार्यभार वाटप
याप्रकरणी घटनास्थळी श्वानपथक रवाना झाले असून पोलिसांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. यासह स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्यातील स्वतंत्र पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जात असून अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. या प्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ खडसे यांच्यामागे साडेसाती Eknath Khadse house theft
काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्यामागे साडेसाती लागल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांचे जावई पुण्यातील एका पार्टीत अडकले होते. आता काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. आणि आता ही घटना ताजी असतानाच त्यांच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.












