पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी पळापळ केली होती. मात्र, त्यानंतर तो लंडनला गेल्याची माहिती देखील मिळाली होती. अशातच आता पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं असून निलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी थेट युके हाय कमिशनसोबत पत्रव्यवहार केला आहे. तसेच, पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने अखेर त्याचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.











