मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्यावर आहेत. यावेळी ठाकरे यांच्यासमोर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. “संपूर्ण संसार अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असताना, जगायचं कसं?“ असा सवाल शेतकऱ्यांनी यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळी ठाकरे म्हणाले, सर्व शेतकरी संकटात आहेत प खचायचं नाही जोमाने लढायचं असा धीर त्यांनी दिला. जिथं जिथं बळीराजावर अन्याय होईल, तिथं तिथं अन्यायाला फोडून काढायचं, असं ठाकरे म्हणाले.
“मी राजकीय प्रचार करायला आलेलो नाही. तुम्ही सर्वजण आता त्या सगळ्याला कंटाळला आहात. निवडणूका आल्या की आम्ही राजकीय नेते येतो व तुमच्या कोपराला गूळ लावून जातो. तुम्ही भोळे भाबडे आपलं आयुष्य कुणाला तरी देऊन टाकता. महाराष्ट्र व मराठवाड्यावर आपत्तीमागून आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीए. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं. मराठवाडा हा अवर्षणग्रस्त भाग आहे. एवढा पाऊस कधी पाहिला नाही असं अनेकांनी सांगितलं. मी मोठा पाऊस झाला तेव्हाही आलेलो. तेव्हा माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली. तेव्हाही शेतकऱ्यांशीच बोललो. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजे,” कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी केली होती.
हेही वाचा – हातपाय हलवणाऱ्या शेतकऱ्याला तोच हात कपाळावर मारून घ्यायची वेळ- उद्धव ठाकरेंचे अजित पवारांवर टीकास्त्र
मी मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमुक्ती केली
आताही माझी तिच मागणी आहे. खरीप तर गेलं आहे. रब्बी देखील आता गेलं आहे. जमीनच खरडून गेली आहे. मग कसं घेणार तुम्ही पिकं? या दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमुक्ती केली होती. मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यावेळी मी कर्जमुक्ती करून दाखवली होती तेव्हा सगळी माहिती सरकार दरबारी जमा आहे. सर्व यंत्रणा सरकारकडे आहे. कर्जमुक्ती साठी आम्ही महात्मा फुले ही सरकारी योजना राबवली होती. तिची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे. मग कसला अभ्यास करतायत हे?“ असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
संपूर्ण संसार अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असताना, जगायचं कसं? हा प्रश्न मराठवाड्यातील प्रत्येक शेतकरी बांधव विचारतोय. पण खचायचं नाही, जोमाने लढायचं हाच धीर पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे गावोगाव जाऊन प्रत्येक शेतकरी बांधवांना आणि माता-भगिनींना देत आहेत.
जिथं जिथं… pic.twitter.com/Tv35hkHJOS— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 5, 2025
सर्व माल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या खिशात घातला
या भागात सोयाबीन कांदा, ऊस, तूर ही पीकं आहेत, सोयाबीनचा भाव साडेतीन हजार, सर्व माल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या खिशात घातला. काही शेतकऱ्यांचं पीक निघालं, बाकी सगळ्यांचं वाहून गेलं. सोयाबीनचा एकरी खर्च 25 हजार आहे आणि आम्हाला पट्टी 23 हजार येते. कांद्याचीही तीच परिस्थिती आहे. नवीन कांद्याचा भाव आहे 10 रुपये. दुध प्रमुख व्यवसाय आहे, भूम तालुका 1 नंबर होता. दूध आता 25 टक्क्यावर आलंय. आम्हाला कर्ज माफी करु नका, जगाची बाजारपेठ आमच्यासाठी खुली करा अशी मागणी यावेळी मोरे यांनी केली.
आजीने आपुलकीने उद्धव ठाकरे यांना दिली शिदोरी
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असून शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरीही उत्साही असल्याचे दिसत आहेत. या दौऱ्यात एका आजीने आपुलकीने उद्धव ठाकरे यांना शिदोरी दिली. तसेच काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सरकारकडून मिळालेला खराब तांदुळदेखील दाखवला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विश्वासघातकी महायुती सरकार आणि त्यांच्या पोकळ आश्वासनांमुळे बळीराजा पुरता खचलाय. त्याला धीर देण्यासाठी आज भूम तालुक्यातील पाथरुड ह्या गावी पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शेतकरी मायबापासोबत संवाद साधला.
काहीही झालं तरी नुकसान भरपाई आणि कर्जमुक्ती मिळवून घ्यायचीच, हा… pic.twitter.com/JWvu9r6GTb— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 5, 2025










