Pune couple cheated by tantric: पुणे शहरातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका भोंदू बाबा ने इंग्लंडमध्ये घर आणि फार हाऊस देण्याचा आम्हीच दाखवत उच्चशिक्षित दांपत्याला 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून त्या उच्चशिक्षक दाम्पत्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. या भोंदू बाबा ने दोन्ही मुलींना बरं करण्याचं आश्वासन देत या दांपत्याला देशोधडीला लावले आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखीन तपास करत आहे.
तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा (Pune couple cheated by tantric)
एका मांत्रिक महिलेसोबतच भोंदू बाबा ने आयटी इंजिनीयरला तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा लावला आहे. या मांत्रिक महिलेचे नाव वेदिका पंढरपूरकर आहे. पुणे शहरात राहणाऱ्या दीपक डोळस या अँटीआयटी इंजिनियर व्यक्तीने मुलींसाठी कशाचाही विचार केला नाही. त्यांनी भोंदू बाबा ने सांगितलेल्या आणि केलेल्या मागणीनुसार पैसे देत राहिला. दीपक डोळस यांच्या मुलींना जन्म जात आजार आहे. हा आजार बरा करण्यासाठी त्यांनी 14 कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे. या भोंदू बाबा ने आपल्या अंगात शंकर महाराज येतात असे सांगून दोन्ही मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करू शकतो असे सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी या आयटी इंजिनियर जोडप्याची फसवणूक केली.
मांत्रिक वेदिका पंढरपूरकर ही या डोळस दंपत्याला वेळोवेळी गंडा घालत होती. b मुलींना असलेला आजार बरा होईल या हेतूने दीपक डोळस हे सर्व मालमत्ता विकायला तयार झाले होते. तसेच काही मालमत्ता विकण्यासाठी वेदिका पंढरपूर यांनी त्यांना भाग पाडल्याचे देखील समोर आला आहे. या डोळस दांपत्याने इंग्लंड येथील त्यांचे स्वतःचे घर विकले. आणि या यातून आलेले पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर वळवले. एवढेच नाही तर या मांत्रिकाने कोथरूडच्या महात्मा सोसायटीमध्ये एक आलिशान बंगला देखील खरेदी केला.
दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीने फसवणूक झाल्याचे कळतात पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून दाद मागितली आहे. पुण्यातील कोथरूड भागांमध्ये राहणाऱ्या या दांपत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून राजेंद्र खडके या भोंदू बाबा सोबत भेट झाली होती
या बाबा ने वेदिका पंढरपूरकर त्यांच्या शिष्याच्या अंगात शंकर महाराज संचालक असे सांगून मुलीचे आजार बरे करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनांना बळी पडून या दांपत्यांनी आपलं सर्वस्व गमावलं. या अंधश्रद्धेतूनच दांपत्याची मोठी फसवणूक झाली










