Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भोर हादरलं! साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला गोठ्यात नेलं, अत्याचार करून संपवलं; पाहा नेमकं काय घडलं?
Top News

भोर हादरलं! साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला गोठ्यात नेलं, अत्याचार करून संपवलं; पाहा नेमकं काय घडलं?

Pune Bhor Crime: राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असताना, पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेवून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांची ६५ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

घटनेचा थरार

मिळालेली माहितीनुसार, पीडित चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आपल्या आजीच्या गावी आली होती. घटनेच्या दिवशी ती घरासमोर खेळत असताना, आरोपीने तिला फूस लावून जवळच असलेल्या एका गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नराधमाने चिमुकलीच्या डोक्यात दगडाने प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर, पाप लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवला.

हेही वाचा: केएल राहुलची शानदार खेळी; दिल्लीडून राजस्थान घरच्या मैदानावर पराभूत

CCTV मुळे उलगडा

दुपारच्या सुमारास मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात येताच कुटूंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, संबंधित वृद्ध आरोपी त्या मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. संशयावरून गोठ्याची झडती घेतली असता, शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या निष्पाप बालिकेचा मृतदेह आढळून आला.

ग्रामस्थांचा उद्रेक आणि ‘रास्ता रोको’

या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांचा संयम सुटला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मुलीचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आणून ठेवला.

आंदोलन: संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

तणाव: गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजकीय पडसाद: “राज्य असुरक्षित”

या दुर्दैवी घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत प्रहार केला.

“आपण एका अत्यंत असुरक्षित राज्यामध्ये राहत आहोत. सर्वसामान्य माणूस जगला काय किंवा मेला काय, याच्याशी सत्ताधाऱ्यांना काहीही देणेघेणे नाही. गृहमंत्री स्वतःला ‘चाणक्य’ किंवा ‘सुपरमॅन’ म्हणवून घेण्यात व्यस्त आहेत,” अशा शब्दांत अंधारे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

घटनेच्या निषेधार्थ गाव बंद

घटनेच्या निषेधार्थ नसरापूर परिसरात गाव बंद पाळण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवत तीव्र निषेध नोंदवला. गावातील दुकाने, बाजारपेठ आणि इतर आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून, सर्वसामान्य जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.

ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत घटनेविरोधात आवाज उठवत आहेत. नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थोडक्यात माहिती: भोर हत्याकांड

पीडित: ४ वर्षांची मुलगी (आजीच्या गावी सुट्टीसाठी आली होती).

आरोपी: ६५ वर्षीय पुरुष (पोलिसांच्या कोठडीत).

कारवाई: पोक्सो (POCSO) आणि हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल.

मुख्य पुरावा: सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरून जप्त केलेले साहित्य.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts