चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला लोक जनशक्ती पार्टीने 28 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 14 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तुलनेने या जागा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पेक्षा अधिक आहेत. 61 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 13 मिळताना दिसत आहेत.
सध्या आलेल्या आकड्यानुसार, जेडीयू हा बिहार मधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या फेऱ्यांनुसार जेडीयू चे 74 उमेदवार आघाडीवर आहेत. तर आरजेडी ला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या आरजेडी च्या पारड्यात केवळ 57 जागा पडताना दिसत आहेत.
भाजपा 72 जागांवर आघाडीवर आघाडीवर असून जेडीयू 68 जागांवर आघाडीवर, आरजेडी 62 जागांवर आघाडीवर आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी जोरदार प्रचार करताना दिसले. मात्र, काँग्रेसला म्हणावं तसं यश आल्याचं आकड्यांमध्ये दिसत नाही.
आतापर्यंतच्या फेऱ्यांमधील घेतलेल्या आघाडीनुसार हे कौल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष निकाल येणं आणखीन बाकी आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणत्या बाजूला निकाल फिरणार का? का आहे त्या प्रमाणे लागणार हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
243 जागांपैकी आतापर्यंत जवळपास 234 जागांवरचे कल हाती आले आहेत. आलेल्या कलानुसार बिहारच्या जनतेने एनडीए च्या बाजून कौल दिल्याचे पाहायला मिळत आहेत. एनडीए ला 155 जागा तर महाआघाडीला केवळ 75 जागांवर आघाडी मिळाली आहे. पक्षनिहाय पाहायला गेलं तर, भाजप- 80 जागा, आरजेडी -59, जागा जेडीयू 66 जागा, काँग्रेस -11 जागा, पीके, -3 लोजपा -8 जागांवर आघाडीवर आहे तर इतरांना 7 जागा मिळणार असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंतच्या कलांमध्ये आजेडी पहिल्यांदाच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आली आहे.
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याची उच्छुकता संपूर्ण देशाला लागली आहे. मात्र, काही तासांत हे स्पष्ट होणार आहे..
बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत असून डावे पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहेत.
अलीनगरमधून BJP च्या मैथिली ठाकूर आघाडीवर… अलीनगरमधून RJD चे विनोद मिश्रा पिछाडीवर… प्रशांत किशोर यांचा जनसुराज 3 जागांवर आघाडीवर…
भाजप आणि आरजेडीमध्ये अवघ्या 1 जागांचं अंतर… भाजप 45 आणि आरजेडी 44 जागांवर आघाडीवर आहे.
सर्वात महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. महुआमधून तेजप्रताप पिछाडीवर पडले आहेत. सध्याच्या आकड्यानुसार, एनडीए 66 जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी 49 जागांवर आघाडीवर आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर पाहायाला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष 14 जागांवर आघाडीवर आहे तर आरजेडी 8 जागांवर जेडीयू केवळ 4 जागांवर आघाडीवर आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरूवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाला सुरूवात होईल. एक्झिट पोलनुसार NDA ला जनतेनं कल दिल्याचे अंदाज दर्शवण्यात आलाय. मात्र, आज प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यानंतर समजेल बिहारच्या जनतेनं कोणाच्या बाजून कौल दिलाय..
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 वाजल्यापासून सुरूवात झाली. हळूहळू करून सत्ता नेमकी कोणाच्या हाती येणार याचे काैल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. सर्वच राजकीय पक्षांनी बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केली. विशेष म्हणजे यंदा बिहारमध्ये मतदानाचा टक्का चांगलाच वाढला. हे कोणासाठी फायदेशीर ठरले हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वांचे लक्ष आता आज 14 नोव्हेंबर 2025 च्या बिहारच्या 243 जागांसाठीच्या मतमोजणीकडे आहे. कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाच्या पदरी निराशा पडते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिहारच्या महिलांना 10 हजार रूपये प्रत्येकी राज्य शासनाने निवडणुकीच्या तोंडावर दिले होते.
(बातमी अपडेट होत आहे..)












