Rohini Acharya allegations : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते आणि आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे रोहिणी आचार्य यांनी स्वत:चे राहते घर सोडल्याची माहिती समाज माध्यमांना दिली आहे. यावेळी, रोहिणी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केले. “तेजस्वी यादव यांनी मला घरातून काढून टाकले. तुझ्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आमचा पराभव झाला, असेही ते म्हणाले’ या घटनेने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?
‘लोकसभेचे तिकीट मिळवणे आणि कोट्यावधींची रक्कम वसूल करण्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले आहे, तसेच माझ्यासोबतच आणि माझ्या तिन्ही बहिणी रागिनी, चंदा आणि राजलक्ष्मी यांनी आमच्या पाटण्यातील कुटुंबीयांचे राहते घर सोडले’. मागच्या वर्षी रोहिणी आचार्य यांचे भाऊ तेजप्रताप यादव यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजेच लालू प्रसाद यादव यांनी आपला मुलगा म्हणून नाकारले होते. इतकंच नाही, तर लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या प्रकरणावर, तेजस्वी यादव यांनी शांत राहणे योग्य समजले. सोबतच, संपूर्ण यादव कुटुंबियांनी मौनव्रत धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.
#WATCH पटना, बिहार: RJD नेता रोहिणी आचार्य ने राजनीति छोड़ने पर कहा, “मेरा कोई परिवार नहीं है। उन्होंने ही मुझे परिवार से निकाला है। उन्हें जिम्मेदारी नहीं लेनी है… सारी दुनिया सवाल कर रही है कि पार्टी का ऐसा हाल क्यों हुआ है?…” pic.twitter.com/XcgyhKV8RA
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2025
शिवानंद तिवारी यांनी लालू प्रसाद वर टीका
शिवानंद तिवारी यांनी लालू प्रसाद वर टीका या घटनेने राजकीय पक्षात खळबळ उडाली असून या प्रकरणावर आता लालू प्रसाद यादव यांचे सहकारी तथा पक्षाचे माजी उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी लालू प्रसाद वर टीका केली आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे कि, ज्येष्ठ राजकीय नेते, त्यांची कन्या आणि मुलगा यांच्यात झालेल्या भांडणानंतर रोहिणी रडत घराबाहेर गेल्या तेव्हा तुम्ही फक्त पाहत बसले होते का?
हे ही वाचा – बिहारमध्ये दसवी बार नितीश कुमार! मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला; कधी होणार शपथविधी?
शुक्रवारी दुपारी बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल जाहीर झाला, ज्यात बीजेपी पक्षाने बहुमत मिळवून आरजेडी पक्षाचा पराभव केला. ज्यामुळे, यादव कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Rohini Acharya allegations)












