FIR registered Director Vikran Bhatt – मनोरंजन क्षेत्रातील अनुभवी आणि नामांकित दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण दोघांसह एकूण 8 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध डॉक्टर डॉ. अजय मुरडिया यांनी राजस्थानातील उदयपूर येथील भूपालपुरा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवला आहे.
दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्यावर डॉ. अजय यांनी आरोप लगावले आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विक्रम भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ बायोपिक बनवण्याचं प्रलोभन दर्शवले, आणि हा चित्रपट तयार झाल्यानंतर 200 कोटींचा मोठा नफा मिळेल, अशी अशा दाखवत त्यांच्याकडून काही टप्प्यांमध्ये 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत केल्याचा आरोप लागवण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला आश्वासन देऊन 31 मे 2024 रोजी 2.5 कोटी रुपये दिग्दर्शकाच्या खात्यात पाठवण्यात आले होते. यावेळी त्यांना चार चित्रपटांचं आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सतत पैस्याची मागणी करत पैश्यांची देवाणघेवाण सुरु होती. त्यानुसार एकूण 30 कोटींपेक्षा अधिक रकमेचे ट्रॅन्जेक्शन करण्यात आले. दिग्दर्शकाने आश्वासन दिलेल्या चित्रपटांपैकी दोन चित्रपट पूर्ण झाले असून एक अर्धवट आहे तर चौथा चित्रपट, ‘महाराणा-रण’चं शुटिंग अद्याप सुरूच झालेलं नाही, तरीही त्यावर सुमारे 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
काय लिहिलंय FIR मध्ये (FIR registered Director Vikran Bhatt)
डॉ. अजय यांनी पोलिसांकडे दर्ज केलेल्या FIR नुसार, ते एका कार्यक्रमावेळी दिनेश कटारिया यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी त्यांना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ बायोपिक बनवण्याचा सल्ला देण्यात आला होता. यावर दिनेश यांनी डॉ. अजय यांना सल्ला दिला होता की, दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ते ओळखतात आणि त्यांनी बायोपिक बनवला तर सर्वांना त्यांच्या पत्नीबद्दल माहिती होईल. आणि त्यांच्या कामाबद्दल लोकांना माहिती मिळेल. याशिवाय चित्रपटाच्या खर्चाच्या 4 ते 5 पट नफा मिळेल. त्यानंतर डॉ. अजय यांना खात्री पटली आणि त्यांनी बायोपिक करण्यास होकार दिला. त्यानंतर ते दिनेश कटारिया सोबत 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईला आले. आणि मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना भेटले. त्यानंतर त्यांनी मी सर्वकाही सांभाळून घेईन, कसलीही चिंता करू नका, अशी हमी दिली. आणि डॉ. अजयला फक्त वेळोवेळी पैसे पाठवायला सांगितले.
डॉक्टर अजय पुढे म्हणाले कि, दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी दुसऱ्या चित्रपटातही गुंतवणूक करण्यास सांगितले होते. “तुम्ही एका बायोपिकमध्ये गुंतवणूक करत आहात, परंतु माझ्याकडे आणखी एक फिल्म प्रोजेक्ट सुरू आहे. जर तुम्ही या प्रोजेक्टसाठी देखील निधी दिला तर तुम्हाला मोठा नफा होईल….” आणि आश्वासन दिलं की, पैसे पूर्णपणे परत मिळतील.












