Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • Maharashtra Liquor Ban : महाराष्ट्रात तीन दिवस मद्यविक्री असणार बंद
Top News

Maharashtra Liquor Ban : महाराष्ट्रात तीन दिवस मद्यविक्री असणार बंद

Notice showing that liquor sale is banned in Maharashtra for three days as per government order

Maharashtra liquor ban : सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणूका पार पाडण्यासाठी तयारी सुरु आहे. या निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर पासून म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशीपासून सलग 3 दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच आता हे 3 दिवस मद्यपीना मद्य मिळणार नाही.

काय आहे आदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्री बंद राहणार आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री, बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी हे सर्व 1 डिसेंबर 2025 पासून 3 डिसेंबर पर्यंत बंद असणार आहे. याबाबत आदेश पारित करण्यात आले असून मतदानाचे निकल जाहीर झाल्यानंतर मद्य विक्री सुरु करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये; राज ठाकरेंचा तपोवणतील झाडे तोडण्याच्या निर्णयावर सरकारवर निशाणा

कधी असणार ड्राय डे

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर म्हणजेच मतदान होण्याच्या पहिल्या दिवशी, 2 डिसेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी, 3 डिसेंबर म्हणजे मतमोजणीच्या दिवशी ड्राय दे असणार आहे. त्यानुसार मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

कुठे होणार मतदान

2 डिसेंबर रोजी होणारे मतदान हे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,ठाणे, अहिल्यानगर, धुळे , जळगाव, नशिराबाद, नंदूरबार नाशिक कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा याठिकाणी पार पडणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts