Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

इंडिगो विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, बाॅम्ब ठेवल्याची धमकी

IndiGo Emergency Landing

मुंबईत इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानात मानवी बाॅम्ब ठेवण्यात आला आहे, अशा प्रकारचा ई-मेल करण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ मुंबई इमर्जन्सी लँडिंग केलं. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा या ई-मेल संदर्भात सर्व बाजूंनी तपास करत आहेत. खबरदारी म्हणून विमानाला एअरपोर्टच्या आयसोलेश बे मध्ये ठेवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवार २ डिसेंबर रोजी सकाळी इंडिगोच्या फ्लाइटने हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन कुवैतला जाण्यासाठी उड्डाण केलं. फ्लाइटने उड्डाण केल्यानंतर धमकीचा ई-मेल आला. त्यात विमानात बॉम्ब असल्याची धमकी होती. त्यामुळे परिसरात काही वेळ घबराट बसरली होती. त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने ATC तात्काळ विमानाला मुंबईच्या दिशेने वळवलं व इर्मजन्सी लँडिंग करायला लावली. फ्लाइटचं सुरक्षित लँडिंग झालं आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

हेही वाचा – तीन वर्षाच्या प्रेमाचा शेवट भयानक, सक्षमच्या हत्याकांडाची आचलने सांगितली ‘आपबिती’

आतापर्यंत कुठल्याही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकं सापडलेली नाहीत

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लँडिंग नंतर विमानाला आयसोलेशन मध्ये नेण्यात आलं आहे. तिथे बॉम्ब निकामी पथक, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF) आणि अन्य सुरक्षा टीम्सनी विमानाची तपासणी सुरु केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत कुठल्याही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकं सापडलेली नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात का केवळ धमकीचा ई-मेल असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला

मागच्या महिन्यात दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटाने देश हादरलेला. त्यानंतर देशातील 5 विमानतळं बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती. इंडिगो एअरलाइन्सला देशातील ५ आंतरराष्ट्रीय विमानतळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली असल्याचा मेल आलेला होता. या ई मेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बाॅम्बने उडवण्यीच धमकी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने खबरदारी या विमानाच इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts