winter eye care tips : हिवाळा हा ऋतू जेवढा सुंदर आणि हवाहवासा वाटतो. त्यापेक्षाही हा ऋतू त्रासदायक देखील ठरतो. थंड हवा, कोरडं वातावरण, यामुळे आपल्या स्किनवर आणि केसांवर त्याचा परिणाम दिसून येत असतो. हिवाळ्यात आपल्याला थंडीची झुळूक उल्हासदायक अनुभव देते. आणि हा थंड वाऱ्याचा फटका आपल्या डोळ्यांना लागतो. म्हणजेच चेहऱ्यासोबतच आपल्या डोळ्यांना देखील हिवाळ्यात त्रास होतो. त्यासाठी आपण आपल्या डोळ्यांची देखील हिवाळ्यात काळजी घेणे गरजेचे आहे.
सकाळची गार हवा, आपला स्क्रीन टाइम रात्रीचे कोरडे वातावरण या सर्वांचा परिणाम आपल्या डोळ्यांवर दिसून येतो. यामुळे आपले डोळे कोरडे पडणे, चुरचुरणे, डोळ्यांना खाज येणे यासारख्या समस्या वाढतात. परंतु आपण आपल्या चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर हा त्रास कमी होऊ शकतो. आणि आपले डोळे देखील निरोगी राहू शकतात. त्यासाठी जाणून घेऊया काही आय स्पेशल टिप्स.
लुब्रिकेटिंग आय ड्रॉप
हिवाळ्यात थंड वातावरण आणि थंड हवेमुळे डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही लुब्रिकेटिंग आय ड्रॉपचे थेंब डोळ्यात टाकू शकतात. यासोबतच तुम्ही प्रिझर्वेटिव्ह फ्री ड्रॉप्सचा देखील वापर करु शकतात. तुमचे डोळे जास्त कोरडे पडत असतील तर या ड्रॉपचा वापर तुम्ही 2 ते 3 वेळेस करू शकतात.
हे ही वाचा : लाईफस्टाईलया कारणाने हिवाळ्यात केस पडतात कोरडे; या उपायांनी तुमचे केस दिसतील चमकदार आणि मऊ
डोळ्याला पाणी लागणार नाही याचीही काळजी
हिवाळ्यात तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर त्या कारणाने देखील तुमचे डोळे कोरडे पडू शकतात. त्यामुळे तुम्ही चेहरा धुताना कोमट पाण्याचा वापर करू शकतात. एवढेच नाही तर चेहरा धुतांना डोळ्याला पाणी लागणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
स्क्रीन टाइम
हिवाळ्यात सहसा आपण घरीच आराम करण्याला प्रेफरन्स देतो. परंतु आपण घरी शांत बसत नाही. आपण मोबाईल, लॅपटॉप यासारख्या स्क्रीन टाइम वाढवणाऱ्या वस्तू हाताळतो. ज्यामुळे स्क्रीन टाइम वाढतो. आणि यामुळे देखील तुमचे डोळे कोरडे पडतात. अशावेळी तुम्ही स्क्रीन टाइम कमी करू शकतात.
उबदार शेक
तुम्ही डोळ्यांना उबदार शेक देऊ शकतात. जेणेकरून ब्लॉक झालेले ऑइल ग्लॅड उघडतील आणि डोळे कोरडे पडणार नाही. त्यासाठी तुम्ही उबदार पाण्यात 5 मिनिट एक कापड भिजवून ठेऊ शकतात. त्यानंतर तोच कापड तुम्ही डोळ्यांवर लावून शेक घेऊ शकतात.
आहारात करा या पदार्थांचा समावेश
हिवाळ्यात सूर्यकिरण हे अत्यंत तीव्र असतात. यामुळे आपले डोळे चुरचुरतात. किंवा बऱ्याचजदा डोळ्यातून पाणी येते. त्यासाठीच आहारात देखील तुम्ही काही पदार्थांचा समावेश करू शकतात. जसे कि, गाजर, पालक, रताळे यांचे सेवन केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या शरीरातील vitamin A चे प्रमाण वाढेल. संत्री, लिंबू, किवी हे पदार्थ खाल्ल्यास vitamin C वाढेल. बदाम आक्रोड आणि मासे याचे सेवन केल्यास ओमेगा 3 वाढते. हे सर्व व्हिटॅमिन तुमच्या शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.








