Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राष्ट्रार्पण
Top News

प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

Defence Minister Rajnath Singh commissions pollution control vessel Samudra Pratap

Samudra Pratap pollution control vessel : आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे भारतीय तटरक्षक दलाच्या समुद्र प्रताप या जहाजाचे राष्ट्रार्पण केले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

भारतीय तटरक्षक दलाने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. हे दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी पहिले आहे. कोस्ट गार्डने या जहाजाची एक छोटी व्हिडीओ क्लिपही जारी केली असून हे जहाज आयसीजीच्या प्रदूषण नियंत्रण, अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणारे आहे.

काय होणार फायदा

भारताच्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज तेल गळती शोधण्यासाठी प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे. तेल फिंगरप्रिंटिंग मशीन, गायरो-स्टेबलाइज्ड स्टैंड ऑफ सक्रिय रासायनिक शोधक आणि पीसी लॅब उपकरणांनी सुसज्ज आहे. या जहाजामुळे सागरी प्रदूषणाशी लढण्याची भारताची क्षमता बळकट होईल आणि संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्याची देशाची वचनबद्धता बळकट होईल.

हे ही वाचा : वाहनधारक सावधान ! तुम्हीही HSRP नंबरप्लेट बसवली नसेल तर होणार दंडात्मक कारवाई; कारवाई टाळण्यासाठी करा हा उपाय

भारताचा आत्मविश्वास बळकट होईल

हे जहाज भारताचा आत्मविश्वास अधिक मजबूत करेल. या जहाजाच्या राष्ट्रार्पणामुळे आपली ताकत आणखी वाढणार असून हे जहाज सामूहिक निर्धाराचे प्रतीक आहे. हे जहाज जेव्हा समुद्राच्या लाटांवरून पुढे जाईल तेव्हा भारतीय तटरक्षक दलासह भारताचा आत्मविश्वास बळकट होईल. सागरी सुरक्षितता मजबूत करण्यासाठी हे जहाज सक्षम आहे. असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज

या जहाजामध्ये आधुनिक क्षमता एकत्रित करण्यात आल्या असून आजच्या सागरी आव्हानांना आधुनिक दृष्टीकोनाची गरज आहे. समुद्र प्रताप हे भारताचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. ते भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे जहाज आहे. या जहाजाची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को गामा येथे करण्यात आली.

अत्याधुनिक यंत्रणा

हे जहाज समुद्रातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले असून या जहाजामध्ये सैद स्वीपिंग आर्म्स, उच्च क्षमतेचे तेल पुनप्राप्ती प्रणाली, फ्लोटिंग बुम्स, अत्याधुनिक स्कीमर्स, स्वतंत्र प्रदूषण नियंत्रण प्रयोगशाळा अशी अत्याधुनिक यंत्रणा सुसज्ज आहे. याशिवाय जहाजात सागरी सुरक्षितता आणि अग्निशमन क्षमतेत वाढ करण्यासाठी शक्तिशाली एक्सटर्नल फायर फायटिंग सिस्टीम बसवण्यात आले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts