Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मोठी बातमी! ‘शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही’; ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया
ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही’; ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी सध्या कोणताही पक्षांतराचा निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.

निकालानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,” शिंदे सेनेत जाण्याचा माझा अद्याप कोणताही निर्णय नाही. मी सध्या कोणत्याही राजकीय हालचालींचा भाग नाही.”

निकालावर काहीही अवलंबून नव्हते

या प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्या राजकीय भूमिकेशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. “निकालावर काहीही अवलंबून नाही,” असे ते म्हणाले.

हेही वाचा: ‘वाद नको, पण उकरला तर गप्प बसणार नाही’; राज ठाकरे यांचा स्पष्ट इशारा

ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया नेमकी काय प्रतिक्रिया आहे?

निकालानंतर भावना व्यक्त करताना त्यांनी संक्षिप्त प्रतिक्रिया देत “कलयुग आहे,” असे म्हटले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Latest Political News)

Omraje Nimbalkar :

पुढील निर्णय मतदारसंघात चर्चा करून

आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत ते म्हणाले की, मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे. “मी मतदारसंघात जाऊन चर्चा करेन आणि त्यानंतर काय करायचे ते ठरवेन,” असे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)

धाराशिव बंदची हाक

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकारांत न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयामुळे स्थनिक राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून विविध ठिकाणी असंतोष व्यक्त केला जात आहे.

निकालानंतर धाराशिव शहरात व्यापारी वर्गाने मोठा निर्णय घेत आपली दुकाने बंद ठेवली. अनेक भागांमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. या निकालाच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनांनीही भूमिका घेत “धाराशिव बंद”ची हाक दिली आहे. (LS Marathi News Channel)

या प्रकरणात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या खटल्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याची भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts