Nitesh Rane Mocks Uddhav Thackeray : काल राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असून भाजप हा पक्ष अग्रगण्य असल्याचे आता म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण भाजपने काल एक हाती सत्ता मिळवली आहे. सर्वांचे यंदाच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सार्वधिक लक्ष लागून होते. आता निकाल स्पष्ट झाला असून 227 जागांपैकी 127 जागांवर भाजप आणि शिवसेनेची आघाडी बघायला मिळाली. त्यापैकी 97 जागा भाजपच्या असून उर्वरित शिवसेना शिंदे गटाच्या आहेत. काल महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. त्यांचा सोशल मीडियावर हसण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
हे ही वाचा : अखेर चार वर्षांनी मुंबईला मिळणार नवीन महापौर; कधी होणार महापौरपदाची निवडणूक, कशी असते प्रक्रिया?
नितेश राणे यांनी उडवली खिल्ली
महापालिका निवडणुकीच्या निकालामध्ये मुंबईत भाजपाने पुन्हा बाजी मारल्याचे बघायला मिळाले. भाजपाकडून मुंबई प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते. भाजपने महापालिका निवडणुकीत विजयाच्या वाटेवर असताना आणि शिवसेना ठाकरे गट याचा पराजय दिसत असताना नितेश राणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवताना दिसले. या व्हिडीओ मध्ये ते पेंग्विन आणि जय श्रीराम म्हणत खोडसर हसतांना दिसले. हा धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
भाजपच्या किती जागा आल्या निवडून
महापालिका निवडणूकीत मुंबई महानगरपालिकेत 227 जागांसाठी 52.94 टक्के मतदान झाले आहे. या महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. आता हा आकडा गाठणार तरी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा 45.22 टक्के, शिवसेना उबाठा 27.52 टक्के, शिवसेना 10.48 टक्के, कांग्रेस 09.31 टक्के, एमआयएम 2.61 टक्के, एमएनएस 2.87 टक्के, एनसीपी 0.95 टक्के, एनसीपी एसपी 0.45 टक्के, एसपी 0.58 एवढी टक्केवारी पक्षाला मिळाली.












