Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना खरंच मिळणार का पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता; काय आहे सत्य
बिजनेस

इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना खरंच मिळणार का पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता; काय आहे सत्य

PM Kisan 22nd Installment for Sharecroppers

PM Kisan 22nd Installment for Sharecroppers : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 लवकरच सादर होणार आहे. त्यानुसार 22 वा हप्ता बदलण्याची शक्यता आहे. हा 22 वा हप्ता कधी बदलणार याची प्रतीक्षा कोट्यावधी शेतकरी करत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळतात. यंदाच्या बजेट 2026 नंतर ही रक्कम दुपट्टीने वाढण्याची शक्यता आहे. परंतु यंदाच्या बजेटमध्ये स्वतःची शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच नाही तर इतरांची शेती कसणाऱ्यांना देखील यंदाच्या बजेट मध्ये फायदा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहे.

इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळण्याची शक्यता

ग्रामीण भागात असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. परंतु हा लाभ शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणाऱ्या भूधारकांनाच दिला जातो. आता 2026 च्या बजेटमध्ये हा मुद्दा मांडण्यात येणार असून इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली होती.

हे ही वाचापंतप्रधान मोदी केरळला देणार मोठी भेट; तीन अमृत भारत एक्सप्रेससह चार नवीन रेल्वे सेवांना दाखवणार हिरवा झेंडा

शेतकऱ्यांना देखील सरकारकडून मोबदला मिळायला हवा

देशात लाखो शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नसल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली होती. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शेती नाही ते शेतकरी इतर व्यक्तींच्या शेतात जाऊन शेती कसतात. दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काबाड कष्ट करतात. आणि मोबदल्यात त्यांना आलेल्या उत्पन्नातील अर्धा भाग दिला जातो. दुसऱ्यांची शेती जरी असली तरी घाम गाळणारा शेतकरी स्वतःची जमीन असल्यासारखी शेतीची आणि पिकांची काळजी घेतो. परंतु तरीही त्या शेतीवर त्याचा अधिकार राहत नाही. परंतु या शेतकऱ्यांना देखील सरकारकडून मोबदला मिळायला हवा.

कोणतीही तरतूद उपलब् नाही

त्यानुषंगाने अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबतच इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्याबाबत चर्चा सुरु होती. तर सध्या सुरु असलेल्या या पीएम किसान योजनेत अशी कोणतीही तरतूद उपलब् नाही. त्यामुळे फक्त अल्पभूधारक ज्याच्या नावाने महसूल दप्तरी जमिनीची नोंद आहे त्याच शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो.

सत्य की अफवा

सरकारी निमानुसार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून ज्याच्या नावर शेती आहे आणि जो शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेच्या मुख्य आधार हा जमीन असून ही योजना छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आली होती. त्यानंतर सरकारने या योजनेत बरेच बदल घडवले. परंतु इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने कोणतीच हालचं केलेली नाही. म्हणून पीएम किसान योजनेचा 22 व्या हप्त्यात इतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याची माहितेय समोर आली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts