Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात यांनी मारली बाजी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Mumbai

150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात यांनी मारली बाजी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

150 Day E Governance Reform Program

150 Day E Governance Reform Program : महाराष्ट्र राज्यात शासकीय कामकाज अधिकच पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी 150 दिवसांचा गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रआयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यातील संवर्गातील सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयाची यादी जाहीर केली आहे.

काय आहे सोशल मीडिया पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर माहिती शेअर करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्ट मध्ये ते म्हणाले की, सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले.

कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत असल्याचे या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:

– जिल्हाधिकारी कार्यालय – जळगाव
– पोलिस अधीक्षक कार्यालय – ठाणे ग्रामीण
– महानगरपालिका – पनवेल
– पोलिस आयुक्त कार्यालय – नाशिक
– विभागीय आयुक्त कार्यालय – नागपूर
– पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय – नांदेड
– राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालय – संचालक, तंत्र शिक्षण
– राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण – महाराष्ट्र सागरी मंडळ
– मंत्रालयीन विभाग – सार्वजनिक बांधकाम विभाग

हे ही वाचा‘….तर नामोनिशाण संपवून टाकू’ वनमंत्री गणेश नाईकांनी साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा

राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार

उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे सोबत जोडली आहेत. तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts