Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ठाणे–बोरिवली प्रवास होणार वेगवान! अवघ्या 15–18 मिनिटांत अंतर कापता येणार; काय आहे नवा मेगा प्रोजेक्ट?
Mumbai

ठाणे–बोरिवली प्रवास होणार वेगवान! अवघ्या 15–18 मिनिटांत अंतर कापता येणार; काय आहे नवा मेगा प्रोजेक्ट?

thane- borvali

Thane Borivali Travel: ठाणे ते बोरिवली प्रवास आता पूर्णपणे बदलणार असून, दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या १५ ते १८ मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले आहे.

ठाणे ते बोरिवली प्रवास आता पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे. सध्या या मार्गासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात, मात्र नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 15 ते 18 मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर वेगाने काम करत आहे.

या प्रकल्पात ठाणे- बोरिवली दरम्यान सुमारे ११.८ किमी लांबीच्या भूमिगत दुहेरी बोगदा तयार केला जात आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगदे असतील, जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. या बोगद्यामुळे ठाणे आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

हेही वाचा: सोलापूर हादरले! रागातून घेतले दोघांचे प्राण; 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या

आधुनिक सहा लेनचा मार्ग

या मेगा प्रकल्पात एकूण सहा मार्गिका असणार आहेत.

३ मार्गिका एका दिशेसाठी
३ मार्गिका दुसऱ्या दिशेसाठी

यामध्ये वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग आणि आपत्कालीन सेवेसाठी एक अतिरिक्त मार्गिका असेल. संपूर्ण प्रणाली आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार केली जात आहे.

खाडी किनारा मार्गाशी थेट जोडणी
हा बोगदा पुढे ठाणे खाडी किनारा मार्गाशी जोडला जाणार आहे. यासाठी उन्नत (elevated) रस्ता तयार केला जाणार असून तो टिकुजी-नी वाडी ते कोलशेत या भागाला जोडेल.

महत्त्वाची कनेक्टिव्हिटी वाढणार

या प्रकल्पामुळे अनेक महत्त्वाचे भाग थेट जोडले जातील, जसे की

बाळकुम
कोलशेत
वाघबीळ
ओवळा
कासारवडवली
मोघरपाडा

यामुळे या परिसरातील प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

मोठा खर्च आणि मोठे नियोजन

या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 18,000 कोटी रुपये इतका आहे. यामध्ये बोगदा, उड्डाणपूल आणि स्टील्ट रोड यांचा समावेश असेल.

2028 पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य

MMRDA च्या नियोजनानुसार हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र अंतिम कालावधी निविदा प्रक्रिया आणि कामाच्या गतीवर अवलंबून असेल.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts