Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईत मोठी कारवाई! तीन-चार मजली झोपड्यांवर फिरवला बुलडोझर, वांद्रे स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
Mumbai

मुंबईत मोठी कारवाई! तीन-चार मजली झोपड्यांवर फिरवला बुलडोझर, वांद्रे स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

mumbai 2

Mumbai | मुंबईत (Mumbai) नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली. मुंबईतली वांद्रे पूर्वेकडील स्टेशनबाहेरील गरीब नगर भागामध्ये रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली. रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीरपणे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच या झोपड्या तीन ते चार मजली अशा इमारतीप्रमाणे उभारण्यात आल्या होत्या. तर बेकायदेशीरपणे या झोपड्या उभारण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने त्यावर थेट बुलडोझर फिरवला.

हेही वाचा – उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप; 51 नेत्यांनी सोडली सपा-बसपाची साथ, केला ‘या’ पक्षात प्रवेश

रेल्वे प्रशासनाने झोपड्यांवर का फिरवला बुलडोझर? कारवाईमागचं कारण काय?

आज (19 मे) सकाळी रेल्वे प्रशासनाने गरीब नगर भागात मोठी कारवाई सुरू केली. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीरपणे तीन, चार मजली झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने या सर्व झोपड्यांवर बुलडोझर फिरवत पाडण्याचं काम केलं. अद्यापही झोपड्या पाडण्याचं काम सुरू आहे. तर या सर्व झोपड्या हटवण्यासाठी प्रशासनाने सहा बुलडोझर आणले आहेत. प्रशासनाने तेथील रहिवाशांना अनेकदा बजावलं होतं, तसेच त्यांना नोटीस देखील दिली होती. मात्र, तरीही तेथील रहिवाशांनी झोपड्या न हटवल्याने प्रशासनाला ही कारवाई करावी लागली.

या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी 1000 पोलीस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. तर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

नवीन रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी संबंधित जागा रिकामी करणं गरजेचं होतं. ही जागा रिकामी झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts