Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ठाण्यात आगीचे रौद्ररूप! पहाटेच्या वेळी भाजी मार्केटला लागली भीषण आग, 2 जणांचा होरपळून मृत्यू
Mumbai

ठाण्यात आगीचे रौद्ररूप! पहाटेच्या वेळी भाजी मार्केटला लागली भीषण आग, 2 जणांचा होरपळून मृत्यू

Thane Gaondevi Vegetable Market Fire | ठाण्यात (Thane) मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील एका भाजीमार्केटला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी भाजी मार्केट (Gaondevi Vegetable Market) परिसरात घडली. भाजी मार्केटला लागलेली आग एवढी भीषण होती की सर्वत्र धुराचे मोठे लोट दिसत होते. तर या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – “…तर आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू”, 10 दिवसांतच विजय सरकार संकटात? सीपीआयएमने दिला थेट इशारा

ठाण्यात भाजी मार्केटला लागली भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, गावदेव भाजी मार्केटमध्ये पहाटे 4 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. मार्केटमध्ये सर्वत्र धुराचे लोट आणि भीषण आग दिसत होती. तर या मार्केट परिसरात विविध साहित्याची दुकाने आणि कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे तेथील प्लास्टिकच्या वस्तू, कपड्यांमुळे आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत अनेक दुकानांनी पेट घेतला. त्यामुळे या परिसरात आगीचे रौद्र रूप पहाण्यास मिळाले.

मार्केटमध्ये ही आग लागताच तिथे रात्रपाळीवर असणारे सुरक्षारक्षक काळू गाडेकर (वय 53) आणि आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (वय 43) हे दोघे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघांनाही तातडीनं कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

या भीषण आगीत अनेक गोडाऊन आणि कपड्यांच्या दुकानांना आग लागल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते. मार्केटला भीषण आग लागल्यामुळे आणि सर्वत्र धुराचे लोट पसरल्यामुळे जवानांना आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते. मात्र, जवानांनी जीवाची बाजी लावत आग आटोक्यात आणली असल्याची माहिती समोर आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts