Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बनावट जात प्रमाणपत्र वादावर सहर शेखची स्पष्ट भूमिका, म्हणाली, “मी कायदेशीररित्या उत्तर देईन…”
Mumbai

बनावट जात प्रमाणपत्र वादावर सहर शेखची स्पष्ट भूमिका, म्हणाली, “मी कायदेशीररित्या उत्तर देईन…”

Sahar Shaikh | एआयएमआयएमची ( AIMIM) नगरसेवक सहर शेखशी (Sahar Shaikh) संबंधित बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे (Fake Caste Certificate Case) मुंब्रामध्ये (Mumbra) राजकीय खळबळ उडाली आहे. सहर शेखच्या कुटुंबावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तपासानंतर, ठाणे तहसीलदार कार्यालयाने सहर शेखचे वडील युनूस शेख यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. तर सहर शेखने निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरवणारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्राचा (OBC Caste Certificate) वापर केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तर या आरोपांवर आता सहर शेखने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा – “कैसे हराया…” म्हणत प्रसिद्ध झालेल्या AIMIM ची नगरसेविका सहर शेखवर गंभीर आरोप, पद गमावणार?

बनावट जात प्रमाणपत्र वादावर काय म्हणाली सहर शेख?

बनावट जात प्रमाणपत्राच्या वादासंदर्भात सहर युनूस शेखने तिची भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणाली की, “माझ्यावर कागदपत्रे बनावट करून निवडणूक लढवल्याचा आरोप होत आहे. लोकांनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. एक माणूस म्हणून, पसरवल्या जात असलेल्या खोट्या गोष्टींमुळे मला धक्का बसला आहे. आम्ही आज या आरोपांबाबत एक आवश्यक पत्रकार परिषद घेतली आहे. तसेच मी न्यायालयात माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा सामना करेन. सर्वांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल”, असा इशारा सहर शेखने दिला आहे.

मागील काही दिवसांपासून म्हटलं जात आहे की, मी नॉट रिचेबल आहे. पण मी प्रत्यक्षात जमिनीवरच काम करत होते. तुम्ही जर लोकांमध्ये राहून काम करत असाल आणि तरीही तुमच्याबद्दल चुकीचं परवलं जात असेल तर त्याचा त्रास होतो. त्यामुळे मी सुरूवातीपासूनच मीडियापासून लांब राहिले होते. तसेच या प्रकरणी मी कायदेशीर लढाई लढणार आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मी कोर्टात प्रत्येक आरोपाला उत्तर देणार आहे, असं सहर शेख म्हणाली.

पुढे ती म्हणाली की, ज्या लोकांनी माझ्यावर आरोप करत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे याला जे कोणी जबाबदार असेल त्यांना कोर्टात उत्तर द्यावं लागले, असंही सहर शेखने म्हटलं आहे.

सहर शेखच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप राजकीय कट असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. तिच्या वडिलांचा दावा आहे की, सर्व कागदपत्रे वैध असून योग्य वेळी पुरावे सादर केले जातील. दरम्यान, एआयएमआयएमची नगरसेविका सहर शेखने आता न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts