• Home
  • राजकारण
  • “कैसे हराया…” म्हणत प्रसिद्ध झालेल्या AIMIM ची नगरसेविका सहर शेखवर गंभीर आरोप, पद गमावणार?
Mumbai

“कैसे हराया…” म्हणत प्रसिद्ध झालेल्या AIMIM ची नगरसेविका सहर शेखवर गंभीर आरोप, पद गमावणार?

sahar shaikh

Sahar Shaikh | “कैसे हराया…” म्हणत रातोरात प्रसिद्ध झालेली मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख ही सध्या अडचीणत सापडली आहे. AIMIM ची नगरसेविका सहर शेखचे नगरसेवकपद आता धोक्यात आले आहे. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या सहर शेखवर निवडणुकीदरम्यान खोटी कागदपत्र दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा – “तू खूप छान दिसतेस, एकटी राहतेस का?” रॅपिडो ड्रायव्हरने तरूणीला केले धक्कादायक मेसेज, नेमकं घडलं काय?

सहर शेखवर नेमके काय आहेत आरोप?

मिळालेल्या माहितीनुसार, सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले, परंतु या प्रक्रियेदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर ठाण्यातील तहसीलदार कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, तपासात अनेक गंभीर विसंगती उघडकीस आल्या आहेत.

तपासात जात प्रमाणपत्र शासनाच्या विहित नमुन्यानुसार नसल्याचे आढळले आहे. तसेच नाव, जन्मस्थान आणि शैक्षणिक कागदपत्रांमधील तपशिलांमध्ये (शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी) फरक आढळले आहेत. तर कुटुंबाचे मूळ निवासस्थान उत्तर प्रदेश (गाझियाबाद) असल्याचे नमूद केले होते, तर ओबीसी प्रमाणपत्र महाराष्ट्रातून मिळवले होते. सोबतच खोटी माहिती देऊन प्रमाणपत्रे मिळवण्यात आल्याचे आणि त्यांचा निवडणुकीत वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

तपासात सर्व बाबी समोर आल्यानंतर सहर शेखचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर हे प्रकरण वरिष्ठ अधिकारी आणि तपास यंत्रणांकडे सोपवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

एआयएमआयएमच्या तिकिटावर नुकतीच ठाणे महानगरपालिका निवडणूक जिंकलेल्या सहर शेख आता या वादामुळे कायदेशीर आणि राजकीय अडचणीत सापडली आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर तिचे नगरसेवक पद रद्द केले जाऊ शकते आणि पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, संबंधित प्रशासकीय प्राधिकरणाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts