Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; 94 व्या वर्षी अखेरचा श्वास, राज्यात शोककळा
Top News

भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; 94 व्या वर्षी अखेरचा श्वास, राज्यात शोककळा

Patil

Gopalrao Patil Death: भाजपचे माजी खासदार आणि लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी लातूर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. वयाच्या 94 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता नवीन एमआयडीसी परिसरातील शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: “तू खूप छान दिसतेस, एकटी राहतेस का?” रॅपिडो ड्रायव्हरने तरूणीला केले धक्कादायक मेसेज, नेमकं घडलं काय?

शिक्षण क्षेत्रातील मोठे योगदान

डॉ. पाटील हे केवळ राजकारणी नव्हते, तर एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख होती. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली.

त्यांच्याच प्रयत्नांमुळे “लातूर पॅटर्न” ही शिक्षण क्षेत्रातील यशस्वी ओळख निर्माण झाली. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी साकार करण्यास मदत केली.

राजकीय कारकीर्द

मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाची पायाभरणी मजबूत करण्यात डॉ. गोपाळराव पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडणूक लढवली आणि भाजपचे नेतृत्व केले.

1990 च्या दशकात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधातही निवडणूक लढवली होती. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना राज्यसभेवरही संधी दिली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts