Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

लातूरात निघृण हत्या! आमदाराची तत्परता अन् आरोपी तासात गजाआड

Brutal murder in Latur : लातूर शहराच्या (Latur murder) रस्त्यावर रात्रीच्या सुमारास रक्ताचा सडा पडला होता. अवघ्या २२ वर्षांच्या प्रज्वल मस्केची निर्घृण हत्या (Prajwal Maske’s brutal murder) करण्यात आली. मात्र, या हत्येनंतर लातूर पोलिसांनी (Latur Police) जे करून दाखवलं, ते कौतुकास्पद आहे. आमदार अमित देशमुखांनी (MLA Amit Deshmukh) फोन फिरवला आणि अवघ्या ६० मिनिटांत पोलिसांनी (The accused was apprehended within 60 minutes) फरार होणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेच्या संपूर्ण थराराची माहिती घेऊया.

हेही वाचा – ड्रिंक अँड ड्राईव्हसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई – पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

​थरकाप ​उडवणाऱ्या घटनेचं ठिकाण होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर. वेळ होती रात्रीच्या ११:३० ची. सगळीकडे शांतता पसरत असतानाच, अचानक आरडाओरडा झाला आणि लातूरचं हृदय मानल्या जाणाऱ्या आंबेडकर चौकात अक्षरषः रक्ताचा सडा पडला. किरकोळ वादातून प्रज्वल मस्के या २२ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. हल्लेखोर इतके निर्दयी होते की, तरण्या जीवची त्यांनी कोणतीही परवा केली नाही. वार केल्यानंतर प्रज्वल रस्ताच्या थारोळ्यात कोसळला अन् आरोपी अंधाराचा फायदा फरार झाले.

क्षणाचाही विलंब न लावता पोलीस प्रशासनाला तात्काळ सूचना

​घटनेची माहिती मिळताच आमदार अमित देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण आणि नागरिकांमधील संताप पाहून देशमुखांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस प्रशासनाला तात्काळ सूचना दिल्या. आरोपी शहराबाहेर जाता कामा नयेत, त्यांना तात्काळ जेरबंद करा, हा आदेश सुटला आणि लातूर पोलीस ॲक्शन मोडवर आले.

घटनाक्रम नेमका कसा होता पाहुयात

​रात्री ११:४० ला आमदार अमित देशमुखांकडून पोलिसांना सूचना मिळाल्या. अन् रात्री ११:४५ ला संपूर्ण शहरात नाकाबंदीचे आदेश जारी करण्यात आले. गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली.​ रात्री १२:२० ला मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा ठिकाणा लागला. ​रात्री १२:३० वाजता फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

एकीकडे लातूरकर या घटनेमुळे हादरले होते, तर दुसरीकडे पोलिसांच्या या सुपरफास्ट कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे. सहसा गुन्हेगार पसार झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी अनेक दिवस लागतात, पण इथे आमदारांची तत्परता आणि पोलिसांची चपळाई यामुळे अवघ्या एका तासात न्याय प्रक्रियेला सुरुवात झाली. ​या हत्येचं नेमकं कारण काय होतं? हे आरोपी आणि प्रज्वल यांच्यात आधीपासून वाद होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पण या कारवाईने एक संदेश नक्की दिलाय, गुन्हा कराल, तर सुटणार नाही लातूर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता इतर शहरांतील पोलिसांसाठीही एक आदर्श आहे. आता गरज आहे ती या आरोपींना कठोर शिक्षा होण्याची, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे कोणाचे आयुष्य संपवण्याची हिंमत कोणी करणार नाही.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts