Iran-US War | सध्या अमेरिका (US) आणि इराणमध्ये (Iran) युद्धविरामासाठी दुसऱ्यांदा चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता इराणने अमेरिकेसोबत चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली वाटाघाटी करणाऱ्यांचे एक पथक इस्लामाबादला पाठवत असले तरी, आता आम्हाला त्यांच्यासोबत शांतता चर्चेत रस नाही, असं इराणने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा – शरद पवारांना रूग्णालयात केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी प्रकृतीबाबत दिली मोठी माहिती
इराणने अमेरिकेसोबत चर्चा करण्यास का दिला नकार?
इराणने म्हटलं आहे की, धमक्या आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. जोपर्यंत अमेरिका इराणी बंदरांवरील नाकेबंदी उठवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा शक्य नाही. तसेच आमची अमेरिकेसोबत चर्चेची दुसरी फेरी घेण्याची कोणतीही योजना नाही, असं इराणने सांगितलं आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत चर्चेची दुसरी फेरी घेण्याची आमची कोणतीही योजना नाहीये. जर अमेरिकेने इस्लामाबादमध्ये एक पथक पाठवले तर ती चिंतेची बाब असेल, असं बघाई यांनी म्हटलं आहे.
🇮🇷 Iran’s Foreign Ministry spokesman Esmaeil Baqaei says Tehran has no plan for another round of negotiations with the Americans.
He says if the U.S. sends a team to Islamabad, that is a matter that concerns them. pic.twitter.com/sqMLi4iTBn
— Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) April 21, 2026
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेसोबतच्या चर्चेच्या पुढील फेरीसाठी आम्ही इस्लामाबादला कोणतेही शिष्टमंडळ पाठवलेले नाही. अमेरिका आपल्या आश्वासनांपासून सातत्याने माघार घेत आहे. जोपर्यंत इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवली जात नाही आणि ट्रम्प यांच्या धमक्या थांबत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेशी चर्चा करण्यास आम्हाला रस नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.










