Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • बाबो…! इराणमध्ये नागरिकांना उघडपणे दिल्या जात आहे AK-47, बंदुका देण्यामागे नेमकं कारण काय?
Top News

बाबो…! इराणमध्ये नागरिकांना उघडपणे दिल्या जात आहे AK-47, बंदुका देण्यामागे नेमकं कारण काय?

Iran-US War | अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. यापार्श्वभूमीवर इराणमध्ये काही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. इराणमध्ये रस्त्यांवर लष्करी वाहने दिसत असून ते तेथील लोकांना उघडपणे AK-47 बंदुका देत आहेत. सोबतच लोकांना बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – गो-तस्करी रोखण्यासाठी फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये; दिला कठोर शिक्षेचा इशारा

इराणमध्ये नागरिकांना का दिल्या जात आहेत बंदुका? नेमकं कारण काय?

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणला आता आपल्या नागरिकांना आणि जगाला हा संदेश द्यायचा आहे की, तो कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. त्यासाठी इराणकडून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये क्षेपणास्त्रे प्रदर्शित केली जात आहेत. तसेच लोकांना AK-47 देऊन त्यांना ते चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, जर इराणसोबत चर्चा अयशस्वी झाली आणि इराणने ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरील आपले नियंत्रण सोडले नाही, तर पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते. ट्रम्प यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर इराण कोणत्याही परिस्थितीसाठी तेथील नागरिकांना तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

इराणी रिव्होल्युशनरी गार्डचे सदस्य नागरिकांना कलाशनिकोव्हसारख्या असॉल्ट रायफल्स कशा वापरायच्या हे उघडपणे शिकवत आहेत. तसेच एका सामूहिक विवाह सोहळ्याच्या मंचावर एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रही प्रदर्शित करण्यात आले होते. तर आता इराणच्या या कृतीकडे केवळ एक लष्करी प्रदर्शन म्हणून नव्हे,तर एक राजकीय आणि मानसिक संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.

इराण सरकार आणि सरकारी माध्यमे लोकांना ‘झनफादा’ मोहिमेत सामील होण्याचे सातत्याने आवाहन करत आहेत. ‘झनफादा’ म्हणजे ‘जे आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत’. सरकारी टीव्ही चॅनेल आणि मोबाईल संदेशांद्वारे लोकांना देशासाठी बलिदान देण्याचे आवाहन केले जात आहे. सरकारचा दावा आहे की, सुमारे 3 कोटी लोकांनी ऑनलाइन फॉर्मद्वारे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या मोहिमेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts