Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिक्षण राज्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका, १०वी, १२वी परीक्षेतील सर्व काॅपी प्रकरणाची चौकशी आदेश 
Top News

शिक्षण राज्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका, १०वी, १२वी परीक्षेतील सर्व काॅपी प्रकरणाची चौकशी आदेश 

Investigation into the copying case

Inquiry order : सध्या राज्यात महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी व बारावीची परीक्षा (10th and 12th board exams) घेतली जात आहे. राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान (Copy-free campaign) चालवले जात आहे. मात्र, कॉपी गैरप्रकर, पेपरफुटी, (Copying irregularities, paper breakage) सीसीटीव्ही बंद करणे, कॉपी पुरवणे तसेच परीक्षा केंद्रावरील सुविधांचा अभाव यामुळे या परीक्षा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत आहे. बीड, चंद्रपूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी कॉपी प्रकरणे उघड झाली आहेत. अशातच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Minister of State for Education Pankaj Bhoyar) यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी माध्यमांनी त्यांना सर्व प्रकरणावर प्रश्न विचारले असता त्यांनी यावर रोखठोक भूमिका मांडली. सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व परीक्षा केंद्रावर उत्तम व्यवस्था होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाची आहे. विद्यार्थ्यांना काही गैरसोयी होत आहेत की नाही त्या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान हे देखील चालवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नागपूर विभागात काही परीक्षा केंद्रावर त्यांनी पाहाणी केली.

नागपूरमध्ये एक घटना उघडकीस

नागपूरमध्ये एक घटना उघडकीस आली आहे. त्यात सतर्क असलेल्या पर्यवेक्षकामुळे ही घटना समोर आली. तातडीने शिक्षण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. समाजात जशा काही चांगल्या प्रवृत्ती असतात तशाच काही वाईट प्रवृत्ती असतात. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली आहे.

24 लोकांना निलंबितही करण्यात आले

या संपूर्ण प्रकरणांमध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या-ज्या ठिकाणी घडल्या असतील त्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभागचे आणि गृह विभागाचे आहे त्यामुळे त्यातून कोणीही सुटणार नाही. मधल्या काळात बीडची घटना समोर आली त्यात कारवाई करण्यात आली. संभाजीनगरमध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत, एका ठिकाणी जवळपास 24 लोकांना निलंबितही करण्यात आले आहे.

संभाजीनगर परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ वायरल

छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला आहे, त्याची सत्यता तपासण्यात येत आहे. जर त्यामध्ये सत्यता आढळली तर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने परीक्षा राबवण्याची व्यवस्था करण्यात आली त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत, असल्याचे मंत्री भोयर म्हणाले.

विद्यार्थिनी वॉशरूमच्या पाहण्याने बाहेर

नागपूर पेपर फुटी प्रकरणात एक विद्यार्थिनी वॉशरूमच्या पाहण्याने बाहेर जात होती. दहा ते बारा मिनिटे ती परत येत नव्हती ही गोष्ट आमच्या परीक्षा पर्यवेक्षकांना लक्षात आल्यावर त्यांनी चौकशी केली. चौकशी केल्यावर तो प्रकार उघडकीस आला आणि एक व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो प्रकार होत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून नागपूर विभागाचे उपसंचालक यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

ज्यांचा कोणाचा समावेश असेल त्यांच्यावर कारवाई

खाजगी कोचिंग क्लास असो किंवा खाजगी व्यक्ती असो किंवा विभागाशी संबंधित कोणी व्यक्ती असो यामध्ये ज्यांचा कोणाचा समावेश असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बीड प्रकरणावर ते म्हणले, मंडप टाकून अशी कुठल्याही केंद्रावर परीक्षा देता येत नाही मात्र असे जर घडले असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंजक भोयर यांनी माध्यमांनी दिली आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts