Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • एक जागा, दोन दावेदार! प्रियंका चतुर्वेदी की शरद पवार; राज्यसभेवरुन महाविकास आघाडीत वाद?
Top News

एक जागा, दोन दावेदार! प्रियंका चतुर्वेदी की शरद पवार; राज्यसभेवरुन महाविकास आघाडीत वाद?

Sharad Pawar vs Priyanka Chaturvedi

Sharad Pawar vs Priyanka Chaturvedi : राज्यातील राज्यसभेच्या जागेसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या शक्यतेवरुन महाविकास आघाडी (MVA) मध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी शनिवारी सांगितलं की जर शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर विरोधी आघाडीला त्यावर चर्चा करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) प्रमुख पवार यांच्यासह सात सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे.

विरोधकांचा एकच उमेदवार निवडुन येणार :

विरोधी पक्षाच्या MVA च्या सध्याच्या संख्याबळामुळं, ते फक्त एकच उमेदवार राज्यसभेत पाठवू शकतात. पवारांसोबत, शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) च्या फौजिया खान, आरपीआय (आठवले) चे रामदास आठवले, भाजपाचे भागवत कराड, काँग्रेसचे रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील पाटील यांचा राज्यसभेचा कार्यकाळ देखील एप्रिलमध्ये संपेल.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा दावा मांडला :

UBT नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी राज्य विधानसभेतील ताकदीचा हवाला देत आगामी राज्यसभा निवडणुकीत एमव्हीए जिंकू शकेल अशा जागेवर आपला पक्षाचा दावा मांडला. ठाकरे म्हणाले की, जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर ही जागा (राज्यसभा निवडणुकीसाठी) UBT ची आहे आणि एमव्हीएमध्ये निश्चितच या दिशेनं चर्चा होईल. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, परंतु मी पक्षाच्या धोरणाचं पूर्णपणे पालन करतो. जर शरद पवार निवडणूक लढवू इच्छित असतील तर काय होईल? आमच्यासमोर हा एकमेव प्रश्न आहे. शिवसेनेनं (UBT) ज्याला उमेदवारी दिली आहे त्याचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु.”

मी कोणाचंही नाव घेतलं नाही :

संजय राऊत म्हणाले, “जर शरद पवार स्वतः त्यांची इच्छा व्यक्त केली तर आम्हाला (MVA) त्यावर चर्चा करावी लागेल. मी त्यापेक्षा जास्त काही सांगितलेलं नाही. मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही.” राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यास गुंतागुंत टाळण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी यांना आणखी एक संधी द्यावी या आदित्य ठाकरे यांच्या विधानाबद्दल विचारलं असता, राऊत म्हणाले की ठाकरे हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्रानं त्यांच्या विधानाचा विचार करावा. मालेगावच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानच्या चित्राच्या प्रदर्शनाभोवतीच्या वादाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी आरोप केला की भाजपा जातीय तणाव निर्माण करण्यासाठी 18व्या शतकातील शासकाचा निवडकपणे वापर करत आहे.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts