Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मालेगाव महापालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पालिका कार्यालयात सामूहिक नमाज पठन प्रकरणी गुन्हे दाखल
Top News

मालेगाव महापालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पालिका कार्यालयात सामूहिक नमाज पठन प्रकरणी गुन्हे दाखल

Namaz recitation debate

Namaz recitation debate : मालेगाव महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महापालिकेतील एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर आता या प्रकारामुळे नव्या मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नमाज पटनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडवली होती. त्यानंतर आता सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा अशा कलमांखाली संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. आता त्यानंतर पुन्हा एकदा मालेगाव महानगरपालिका चर्चेत आली आहे. मालेगाव महापालिकेच्या एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे आता मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागात काही आंदोलकांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सरकारी कार्यालयात अशा प्रकारे धार्मिक कृत्य करणे योग्य नसल्याचा सूर उमटत आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा – रोहित पवार आक्रमक! व्हिएसआर कंपनीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पवार कुटुंब बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या..

नमाज पठण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

लोकसंघर्ष समितीचे लुकमान, सलीम एक्का यांच्या सह चार ते पाच जणांवर मनपाच्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्या प्रकरणी मालेगावच्या किल्ला पोलिस ठाण्यात BNS कलम 132 ,292, 189(2), 190 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा अशा कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला. नमाज पठण प्रकरणी संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले होते तर विविध राजकीय स्तरातून देखील प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या होत्या.

नमाज पठण होणे हा नियमांचा भंग

या प्रकरणाची दखल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारे नमाज पठण होणे हा नियमांचा भंग असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, ज्या विभागात हा प्रकार घडला त्या विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या मागणीमुळे प्रशासनावर आता कारवाईचा दबाव वाढला आहे.

शिंदे गटाचा संवेदनशील विषयावर सावध पवित्रा

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने या संवेदनशील विषयावर सावध पवित्रा घेतला आहे. हा विषय धार्मिक असल्याने आम्ही याचे राजकारण करणार नाही, अशी भूमिका शिवसेना गटनेते निलेश आहेर यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारी कार्यालयात नमाज पठण करणे हे कायदेशीररीत्या योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात महापालिका प्रशासन कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षातील दोन प्रमुख मित्रपक्षांच्या भूमिकेत यामुळे थोडा फरक पाहायला मिळत आहे.

भाजपासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

या संपूर्ण प्रकरणावर मालेगाव महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. महापालिकेचे अधिकारी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. दरम्यान भाजपासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून महापालिका आयुक्त कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण करत निषेध व्यक्त केला. नमाज पठण करणाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर महापालिका पवित्र करण्यासाठी शुद्धीकरणाचा कार्यक्रम करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

राजकीय वातावरण ढवळून निघाले

मालेगाव शहर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे आणि आता सरकारी कार्यालयातील या नमाज पठणामुळे पुन्हा एकदा शहरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकंदरच या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts