Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब देत लोणावळा नगरपरिषद अध्यक्षांचा अनोखा इशारा
Pune

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब देत लोणावळा नगरपरिषद अध्यक्षांचा अनोखा इशारा

Lonavala Municipal Council

Lonavala Municipal Council : कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ असतानाही अनेक कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लोणावळा नगरपरिषद अध्यक्षांनी अनोख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा ‘सन्मान’ करत वेळेचे महत्त्व लक्षात आणून देण्याची आगळीवेगळी शक्कल लढविण्यात आली. ही अनोखी मोहीम लोणावळा नगरपरिषद अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आली.

अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी अचानक नगरपरिषद कार्यालयात हजेरी

माहितीनुसार, लोणावळा नगरपरिषदेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळ पाळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. सकाळी ९.४५ वाजता कार्यालय सुरू होत असतानाही अनेक कर्मचारी १० वाजल्यानंतर कार्यालयात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेत अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी अचानक नगरपरिषद कार्यालयात हजेरी लावली.

१० वाजल्यानंतर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान

यावेळी १० वाजल्यानंतर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र हा सन्मान देताना अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्त्व समजावून सांगत पुढील काळात कार्यालयीन वेळ काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या कामांसाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढावी, यासाठीच हा उपक्रम

दरम्यान, यापुढे कार्यालयीन वेळेनंतर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही अध्यक्ष सोनावणे यांनी दिले आहेत. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढावी, यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनीही यापुढे वेळेचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts