8th Pay Commission salary update: आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बेसिक पगारापासून थकबाकीपर्यंत नेमके किती आणि कधी पैसे मिळू शकतात, ते जाणून घेऊया.
आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. कर्मचारी संघटनांकडून फेटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी जोर धरत असून, ती मेनी झाल्यास किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते. याशिवाय, वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर मोठ्या एरियरचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष
देशभरातील सुमारे ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास ६९ लाख पेन्शनधारक सध्या ८ व्या वेतन आयोगाकडे लक्ष ठेवून आहेत. हा आयोग त्यांच्या आर्थिक स्थैर्याशी आणि भविष्यातील जीवनमानाशी थेट संबंधित मानला जातो.
सरकारने आयोगाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर विविध कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञांकडून वेतन संरचना, भत्ते आणि पेन्शन सुधारणा याबाबत चर्चा सुरू आहे. आयोगाकडून सविस्तर अहवाल पुढील काही वर्षात सरकारकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: White Discharge: व्हाइट डिस्चार्ज म्हणजे काय? लक्षणे आणि घरगुती सोपे उपाय जाणून घ्या
सॅलरीत मोठा बदल
कोणत्याही वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. याच आधारे सध्याच्या बेसिक सॅलरीचे नवीन वेतनात रूपांतर केले जाते.
सध्या कर्मचारी संघटना 7व्या वेतन आयोगातील 2.57 फिटमेंट फॅक्टर वाढवून किमान 2.86 किंवा त्याहून जास्त करण्याची मागणी करत आहेत.
जर 2.86 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर संभाव्य बदल असे असू शकतात:
सध्याची 18,000 रुपयांची किमान बेसिक सॅलरी वाढून सुमारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते
मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांचे वेतनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते
बेसिक वाढल्यामुळे HRA आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे
यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत अधिक आर्थिक दिलासा मिळू शकतो.
पेन्शनधारकांसाठीही मोठे बदल
८वा वेतन आयोग पेन्शनधारकांसाठीही काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवू शकतो.
संभाव्य बदलांमध्ये:
पेन्शन कम्यूटेशनची कालमर्यादा कमी करणे
जास्त वयात मिळणारी अतिरिक्त पेन्शन लवकर सुरू करणे
मेडिकल अलाउन्स वाढवण्याचा प्रस्ताव
किमान पेन्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता
यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य खर्च आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होऊ शकते.
थकबाकी मिळण्याची शक्यता
जर ८व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या, तर त्या मागील तारखेपासून लागू केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अंमलबजावणीच्या तारखेपर्यंतचा फरक थकबाकी स्वरूपात कर्मचाऱ्यांना एकरकमी मिळू शकतो. काही अंदाजानुसार, अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखोंच्या घरात एरियर जमा होऊ शकतो.
सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबत वेगळी व्यवस्था
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू होत असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (CPSE) वेतन ठरवण्याची प्रक्रिया वेगळी असते. या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रामुख्याने त्या संस्थेची आर्थिक स्थिती, नफा आणि व्यवस्थापनाच्या निर्णयांवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना वेतन आयोगाचे नियम थेट लागू होत नाहीत.












