Dubai Airport Drone Attack: दुबई विमानतळावर इराणचा मोठा ड्रोन हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. हल्ल्यानंतर आकाशात मोठा धुराचा लाट दिसून आला असून, परिसरात या आपत्कालीन पथकांची त्वरित कारवाई सुरु आहे.
आखाती प्रदेशातील वाढत संघर्ष आता दुबईसारख्या महत्वाच्या शहरांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसत आहे. सोमवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली आणि आकाशात काळ्या धुरांचे मोठ- मोठे लोट दिसले. सुरक्षा कारणास्तव त्वरित आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली.
हेही वाचा: Akshaya Tritiya 2026: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या सोने-चांदी खरेदीचे शुभ मुहूर्त
यापूर्वीही रविवारी दुबई आणि कुवेत येथील विमानतळांवर ड्रोन हल्ल्यांमुळे स्फोट आणि आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. जरी प्रारंभिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी नोंदवलेली नाही, तरी परिसरात सुरक्षा उपाय आणि बचाव कार्य सुरू आहे. नागरिकांनी अधिकृत स्रोतांकडून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Dubai Media Office ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन घटनेमुळे विमानतळाजवळील इंधनाच्या एका टाकीला धक्का बसला आणि त्यानंतर आग लागली. काही वेळातच बचाव पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेनंतर Dubai Civil Aviation Authority ने प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Dubai International Airport येथील सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधून उड्डाणांबाबत अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही घटना मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, Iran कडून United Arab Emirates वर आतापर्यंत १,८०० पेक्षा अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
या संघर्षादरम्यान विमानतळ, बंदरे आणि तेलसंबंधित सुविधांसह अनेक नागरी ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, UAE Ministry of Defence च्या माहितीनुसार संघर्ष सुरू झाल्यापासून सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात चार नागरिक आणि दोन लष्करी जवानांचा समावेश आहे. त्या दोघांचा मृत्यू तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात झाल्याचे सांगण्यात आले आहे.












