Sarke Chunar Teri Sarke Song: केडी: द डेविल चित्रपटातील नवीन गाणे ‘सरके चुनर तेरी सरके’ रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात नोरा फते आणि संजय दत्त यांनी जबरदस्त डान्स प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
संजय दत्तचा आगामी चित्रपट ‘केडी: द डेविल’ हा ३० एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच यातील नवीन गाणे रिजिल झाले असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात नोरा फतेही आणि संजय दत्त जबरदस्त अंदाजात दिसत आहेत. हाई- एजन्सी म्युझिक आणि जबरदस्त डान्समुळे हे गाणे प्रेक्षकांचे आवडते बनले आहे.
संजय दत्त आणि नोरा फतेहीची जबरदस्त जोडी
गाण्यात नोरा फतेही तिच्या दमदार डान्स आणि स्टाईलने पूर्णपणे स्क्रीनवर छाप सोडते. तिचे सिग्नेचर मूव्ह्ज आणि एक्सप्रेशन्स या गाण्याला अजून खास बनवतात. तर संजय दत्तही गाण्यात वेगळ्या अंदाजात दिसतात आणि डान्स फ्लोअरवर त्यांच्या उपस्थितीने गाण्याची एनर्जी वाढवली आहे. या गाण्याचे म्युझिक अर्जुन जन्या यांनी तयार केले असून त्याचे बीट्स प्रेक्षकांना नाचायला लावतात. तर गाण्याला आवाज दिला आहे मंगली यांनी, आणि चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम यांनी केले आहे.
कन्नड चित्रपटात नोरा फतेहीचा डेब्यू
बेंगळुरू येथील AMB सिनेमाजच्या एका इव्हेंटमध्ये हे गाणे लॉन्च करण्यात आले. या कार्यक्रमात नोरा फतेही म्हणाल्या की या चित्रपटाचा भाग होणे तिच्यासाठी एक खास अनुभव होता. जेव्हा तिने चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, तेव्हा तिला कळाले की दिग्दर्शक प्रेम यांना ‘शोमॅन’ का म्हणतात. हा चित्रपट तिच्यासाठी कन्नड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये डेब्यू ठरतो, ज्याचा तिला अभिमान आहे. प्रेक्षकांसाठी हे गाणे कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मलयाळम भाषांमध्ये रिलीज झाले आहे.
चित्रपटाची टीम आणि स्टारकास्ट
चित्रपट ‘केडी: द डेविल’ चे प्रोड्यूसर वेंकट के नारायण असून तो KVN प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात ध्रुवा सरजा, संजय दत्त, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी, वी. रविचंद्रन, रमेश अरविंद, रीशमा ननैया हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मोठ्या बजेट आणि दमदार अॅक्शनसह तयार करण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. नवीन गाणे ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे आणि सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.












