Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Railway Jobs: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११ हजारांहून अधिक लोको पायलट पदांसाठी लवकरच भरती होणार जाहीर
ताज्या बातम्या

Railway Jobs: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११ हजारांहून अधिक लोको पायलट पदांसाठी लवकरच भरती होणार जाहीर

railway Recruitment 2026

Eligibility Criteria for Loco Pilot Posts: रेल्वेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी समोर आली आहे. असिस्टंट लोको पायलट पदांसाठी हजारो जागांची भरती जाहीर झाली असून, इच्छुकांना लवकरच ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी तब्ब्ल ११ हजारांहून अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली असून, देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे तरुणांना केंद्र सरकारच्या नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया निश्चित तारखेपासून सुरू होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारीला लागणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Sun Transit 2026: सूर्याचे नक्षत्र परिवर्तन! १८ मार्चपासून ‘या’ ३ राशींचा गोल्डन टाईम सुरू, सगळी स्वप्न होणार पूर्ण

अर्ज कधी आणि कसा करायचा?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होईल आणि १४ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करणे आवश्यक असून त्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

पदांची संख्या आणि तपशील

या भरतीद्वारे सुमारे ११,१२७ पदे भरण्यात येणार आहेत. विविध रेल्वे विभागांनुसार पदांचे वाटप करण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत https://www.rrbcdg.gov.in/ नोटिफिकेशनमध्ये दिली जाईल.

वयोमर्यादा आणि वेतन

वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे

आरक्षित प्रवर्गांना नियमांनुसार सवलत

निवड झालेल्यांना १९,९०० रुपये प्रारंभिक वेतन (पे लेव्हल-2) आणि इतर भत्ते मिळतील

पात्रता

किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक

संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र

किंवा

मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल शाखेत डिप्लोमा/पदवी असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात

निवड कशी होईल?

कंप्यूटर आधारित परीक्षा (CBT-1 आणि CBT-2)

एप्टीट्यूड टेस्ट

कागदपत्र पडताळणी

वैद्यकीय चाचणी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts