Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आनंदाची बातमी! रामनवमीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारकडून मोठं गिफ्ट; कोण ठरणार लाभार्थी?
Top News

आनंदाची बातमी! रामनवमीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारकडून मोठं गिफ्ट; कोण ठरणार लाभार्थी?

railway Employe News

Government Announces Big Gift for Railway Employees: यंदा रामनवमी २६ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने रेल्वेच्या रनिंग स्टाफसाठी महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊयात लाभार्थी कोण ठरणार आहे.

रामनवमी २०२६ पूर्वी भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे मंत्रालयाने १ जानेवारी २०२४ पासून ” किलोमीटर भत्ता” (Kilometrage Allowance) आणि किलोमीटरच्या ऐवजी दिला जाणारा भत्ता (ALK) मध्ये सुधारणा केली आहे. या महत्वाच्या बदलामुळे ८ वा वेतन अयोग लागू होण्याच्या आधीच रनिंग स्टाफला मोठा अधिक फायदा होणार आहे.

हेही वाचा: लक्ष्मीची विशेष कृपा! आजचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरू शकतो गेम-चेंजर; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

काय आहे हा बदल?

ट्रेन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित पगारासमोर त्यांनी केलेल्या प्रवासाच्या अंतरानुसार अतिरिक्त भत्ता दिला जातो. या भत्त्याला किलोमीटर भत्ता म्हणतात. आता या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. तसेच, जेव्हा रनिंग स्टाफला ट्रेन चालवण्याऐवजी प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी किंवा बैठकींसाठी नेमले जाते, तेव्हा त्यांना ALK दिला जातो. या भत्त्यातही २५% वाढ करण्यात आली आहे.

https://x.com/8thpaycommision/status/2035224210948464642

कोणाला होणार फायदा?

या निर्णयाचा फायदा सुमारे २ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. विशेषतः रनिंग स्टाफमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

एरियरही मिळणार

हा निर्णय १ जानेवारी २०२४ पासून लागू असल्याने, कर्मचाऱ्यांना वाढीव रकमेचा थकबाकी (एरियर) देखील मिळणार आहे.

निर्णयामागचं कारण

महागाई भत्ता (DA) ५०% च्या पुढे गेल्यानंतर काही भत्त्यांमध्ये बदल करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच सरकारने हा निर्णय घेतला आहे. ८वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच घेतलेल्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts