• Home
  • ताज्या बातम्या
  • Morning Breakfast Recipe: उपीट खाऊन बोर झालात? १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट शेवयांचे उपीट, पाहा रेसिपी
ताज्या बातम्या

Morning Breakfast Recipe: उपीट खाऊन बोर झालात? १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट शेवयांचे उपीट, पाहा रेसिपी

Shevaya Upit

Essay Morning Breakfast Recipes: रोजचा नाश्ता कंटाळवाणा वाटतोय का? फक्त १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट शेवयांचे उपीट, जे मुलांना नक्कीच आवडेल

रोज रोज तोच पोहे-उपीट किंवा इडली खाऊन कंटाळा आला आहे का? तुम्हाला काहीतरी वेगळं नवीन, हेल्दी आणि स्वादिष्ट पदार्थ ट्राय करायचे असेल तर ही सोपी डिश तुमच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. फक्त १० मिनिटांत तयार होणारा क्रिस्पी शेवयांचे उपीट नाश्त्यासाठी उत्तम आहे. हलका, पौष्टिक आणि मुलांना नक्कीच आवडणारा. सोपा आणि पटकन तयार होणारा हा नाश्ता सकाळी थोडा क्रंच आणि स्वाद वाढवण्यासाठी एकदम योग्य आहे.

हेही वाचा:

साहित्य

१ कप शेवया (वाळवलेल्या किंवा रोस्ट केलेल्या)
जिरे
मोहरी
कडीपत्ता
शेंगा
कांदा
टोमॅटो
हिरवी मिरची
१ टेबलस्पून तूप/तेल
हळद

कृती

एका कढईत थोडे तूप किंवा तेल गरम करा. त्यात शेवया घालून हलक्या आचेवर २ मिनिटे भाजा आणि नंतर ताटात काढून ठेवा.

त्याच कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करा.

त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून चांगले भाजून घ्या.

आता त्यात शेंगा घाला आणि काही सेकंद परतून घ्या.

नंतर १ ग्लास पाणी ओता आणि उकळी येऊ द्या.

उकळी आल्यावर त्यात भाजलेली शेवया टाकून चांगले वाफवून घ्या.

सर्व्ह करताना वरून बारीक शेव आणि कोथिंबीर घालून सजवा.

अशा प्रकारे तुमचे गरमागरम, क्रिस्पी आणि स्वादिष्ट शेवयांचे उपीट तयार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts