Sabudana Rajgira Chilla: श्रावण महिना सुरू झाला असून तुम्हीही उपवास करत असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. फक्त १० मिनिटांत झटपट, चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा-राजगिराचा चीला तयार करा.
श्रावणातील उपवास म्हटलं (Shravan fasting recipe) की नेहमीचे साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून काहीतरी वेगळं, रुचकर आणि पोटभर बनवायचं असेल, तर साबुदाणा- राजगिरा चीला (Sabudana Rajgira Chilla) नक्की करून पाहा. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा चीला दही किंवा चटणीसोबत अप्रतिम लागतो. चला तर जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य काय आहे. (Shravan food)
हेही वाचा: बुध गोचराने बदलेल या 5 राशींचं गणित; धन, नोकरी आणि नात्यांमध्ये राहा सावध!
साहित्य
साबुदाणा – १.५ कप
राजगिरा पीठ – ४ टेबलस्पून
भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट – ४ टेबलस्पून
उकडलेले बटाटे – २
दही – ४ टेबलस्पून
हिरव्या मिरच्या – २ ते ३
जिरेपूड – ½ टीस्पून
सेंधव मीठ – आवश्यकतेनुसार
कोथिंबीर – बारीक चिरलेली
पाणी – आवश्यकतेनुसार
तूप – भाजण्यासाठी
कृती (Sabudana Rajgira Chilla Recipe)
साबुदाणा स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडा झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पीठ तयार करा. त्यामध्ये राजगिरा पीठ, शेंगदाण्यांचा कूट आणि उकडलेले बटाटे घाला. (fasting recipe)
आता त्यात दही, हिरव्या मिरच्या, जिरेपूड, सेंधव मीठ आणि चिरलेली कोथिंबीर मिसळा. थोडे-थोडे पाणी घालत मिश्रणाची मध्यम घट्टसरसर पेस्ट तयार करा. पीठ फार पातळ ठेवू नका.
मिश्रण साधारण ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे साबुदाण्याचे पीठ थोडे मऊ होईल आणि चीला तव्यावर सहज पसरवता येईल.
तवा गरम करून त्यावर थोडे तूप लावा. त्यावर पीठाचा एक भाग घेऊन चमच्याच्या मदतीने गोलाकार आणि शक्य तितका पातळ पसरवा. कडांना थोडे तूप सोडा आणि झाकण ठेवून काही वेळ भाजा.
खालची बाजू हलकी सोनेरी आणि कुरकुरीत झाली की चीला अलगद पलटा. दुसरी बाजूही छान भाजून घ्या. अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे चीले तयार करा.
सर्व्ह करताना
गरमागरम साबुदाणा-राजगिरा चीला ताज्या दह्यासोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा उपवासासाठी योग्य चटणीसोबत सर्व्ह करा.
श्रावणातील उपवासाच्या दिवशी (Maharashtrian upvas recipe) नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. कमी वेळात तयार होणारा हा चीला चविष्ट तर आहेच, शिवाय शेंगदाणे, राजगिरा आणि बटाट्यामुळे पोटही भरून राहते.









