Top News

सकाळच्या नाश्त्याला बनवा लोडेड चिझ सँडविच; आजच नोट करा रेसिपी

Sandwich

Loaded Cheese Sandwich is Perfect for Breakfast: सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता आहे. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी रेस्टॉरंट किंवा कॅफे सारखा लोडेड चिझ सँडविच घरच्या घरी बनवायचा असेल, तर ही सोपी रेसिपी (Easy Recipe)लगेच नोट करा.

सँडविच (Sandwich ) हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता आहे. छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी आवडता पदार्थ आहे. सहज . रेस्टॉरंट किंवा कॅफे (Cafe) मध्ये मिळणाऱ्या लवकर बनवता येणाऱ्या, गरमागरम आणि चीजने (Cheese) भरलेल्या सँडविचची चव घरच्या घरी सोपे पद्धतीने बनवता येते. सकाळच्या गडपडीत तुम्ही कमी वेळेत हा पदार्थ खूप कमी साहित्यात बनवू शकतात. चला तर जाणून घेऊयात घरच्या घरीच कॅफे स्टाइलचा सँडविच सहज बनवू शकाल.

हेही वाचा: अमरनाथ यात्रा लवकरच; ‘या’ तारखेपासून नोंदणी करता येणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

साहित्य

ब्रेड स्लाईड
बटर
मोजरेला किंवा चेडर चीज (4-6 स्लाइस किंवा किसलेले)
टोमॅटो
काकडी
ग्रेन चटणी
हर्ब्स – ओरेगानो किंवा ऑल स्पाइसेस
मीठ

कृती

सर्वप्रथम, ब्रेड स्लाइसवर थोडा बटर लावा.

ब्रेडच्या एका स्लाइसवर किसलेले चीज, टोमॅटो आणि काकडीचे स्लाइस ठेवा. हवे असल्यास थोडा मीठ, मिरी आणि हर्ब्स शिंपडा.

दुसरा ब्रेड स्लाइस वर ठेवून हलके दाबून सँडविच बनवा.

तवा गरम करून त्यावर थोडा बटर लावा. सँडविच दोन्ही बाजूंनी सुवर्णसरद्र रंग येईपर्यंत भाजा.

गरमागरम लोडेड चिझ सँडविच टोमॅटो सॉस किंवा हर्ब सॉस सोबत सर्व्ह करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts